Rupali Thombre : वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांना रुपाली ठोंबरे यांचे ‘हे’ गिफ्ट

एमपीसी न्यूज : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळाच (Rupali Thombre) कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 10 जून या दिवशी वाढदिवस असतो. त्यांच्या याच वाढदिवसाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून चंद्रकांत पाटील यांना खोचक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बॉटल, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरियरने पाठवला आहे. त्यानंतर या विषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक सल्ला दिला आहे. 

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील केलेल्या वक्तव्याचा संदर्भ धरून रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना हा खोचक सल्ला दिला आहे. राज्यात कुठेही निवडणूक लावा, मी जर निवडून आलो नाही तर हिमालयात जाईल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापूर येथे लागलेल्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील निवडणूक लढले नाहीत आणि त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.

Rajya Sabha Election 2022 : भाजपच्या विजयाचे श्रेय पुण्याच्या ‘या’ दोन आमदारांना!

 

त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी आता शब्द पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे, मात्र ते केले नाही असे रूपाली पाटील म्हणाल्या. त्या पार्श्‍वभूमीवर आज आम्ही त्यांना हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी, तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट कुरियरने पाठवत आहोत असे रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यांनी आता हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला शांती मिळेल. तसेच त्यांच्या संस्कारांमध्ये देखील वाढ होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात जावं आणि आपला शब्द पाळावा असा सल्ला पण ठोंबरे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.