Rupeenagar : चुकीच्या पद्धतीने विजेची बिले काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – सौंदणकर यांची मागणी

रुपीनगर, तळवडेतील वीजग्राहक हैराण; महाराष्ट्र राज्य विद्युत पुणे जिल्हा संनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलींद चौधरी यांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – रुपीनगर, तळवडे आणि प्राधिकरण भागात चुकीच्या पद्धतीने विजेची बिले काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच वारंवार वीज गायब होण्या संदर्भात प्राधिकरण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलींद चौधरी यांना शिवसेना रुपीनगर शाखा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पुणे जिल्हा संनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रुपीनगर, तळवडे या भागात (दि. 10) पासून जुलैच्या रिडींगला सुरुवात होत असून, मागील काही महिन्याचा वीज बिलांचा आढावा घेतला असता, असे दिसून आले आहे की 70 टक्के हून अधिक फोटो हे अस्पष्ट दिसत आहेत. यामुळे प्रमाणीकरण (validation) करता येणे शक्य नाही. त्याचात संबंधित ठेकेदार हा महिन्याच्या महिन्याला रीडिंग घेत नाही. तसेच मागील महिन्यात खूप साऱ्या वीज ग्राहकांची चुकीची रिडींग घेण्यात आल्या कारणाने बऱ्याच ग्राहकांची चुकीची क्रेडिट बिले तयार झालेली आहेत.

_MPC_DIR_MPU_II
  • तसेच 5-7 महिन्यात सरासरी बिल हे चुकीचे रिंडिंग टाकून नॉर्मल करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बी 80 ची संख्या देखील वाढलेली आहे. यामुळे वीज ग्राहकांना ठेकेदाराच्या चुकीमुळे अवास्तव वाजवी बिले भरावी लागत आहेत. यास संबंधित (कॅमप्युटर) ठेकेदार जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. यामुळे या महिन्यापासून चुकीची रिडींग घेण्यात येऊ नये. चुकीची बिले देणाऱ्या ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित ठेकेदाराला चाकण आणि राजगुरुनगर येथेही काळ्या यादीत टाकून काम काढून घेण्यात आले. त्याच पद्धतीने येथीही करण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

तसेच उशिरा बिले देणे आणि चुकीची बिले दिल्यामुळे ग्राहकांना जो मनस्ताप सोसावा लागत आहे त्यातून आपण संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याऐवजी दुसरा ठेकेदार नेमून ग्राहकांना मिळणाऱ्या चुकीच्या बिलापासून त्वरित सुटका करावी. तसेच रूपीनगर सहयोगनगर येथे विजेचा लपंडाव होत असून नागरिकांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे योग्य ती करवाई करुन वीज ग्राहकाना दिलासा द्यावा. अन्यथा, शिवसेना रुपीनगर शाखेच्या वतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

  • यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत पुणे जिल्हा संनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, नितिन बोंडे (शाखा प्रमुख), अमित शिंदे (युवासेना चिटणीस), सतीश मरळ (विभाग प्रमुख), संजय गिरी (उपविभाग प्रमुख), अशोक जाधव, रमेश पाटोळे, दत्ता ढोले, प्रवीण पाटिल, किशोर शिंदे, गणेश भिंगारे, अजित कदम, अरुण ढाके, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.