Pune : विकासान्वेष फाउंडेशन’च्या ‘रुरल इंडिया’ वार्षिक परिषदेचे उद्घाटन

'ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ' विषयावर परिषदेत चर्चा

एमपीसी न्यूज- ‘विकासान्वेष फाउंडेशन’तर्फे पुण्यात ‘रुरल इंडिया’ या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज चे संचालक विजय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होत असून देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, संशोधक त्यात सहभागी झाले आहेत. पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात 7 ते 9 नोव्हेंबर रोजी ही परिषद होत आहे.

‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर, सल्लागार अजित कानिटकर, गिरीश सोहनी (संचालक, बाएफ), अंशू भारतीय, उषा गणेश, बिक्षम गुज्जा, सी शंभू प्रसाद उपस्थित होते. परिषदेचे आयोजक असलेले ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हा टाटा ट्रस्ट्सचा एक सामाजिक उपक्रम आहे .

पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे . परिषदेच्या उदघाटन सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले . सामाजिक उद्योजकतेचे भवितव्य ( सोशल एंटरप्रायजेस ) या विषयावर झालेल्या परिसंवादात गिरीश सोहनी ( अध्यक्ष, बाएफ ), सी. शंभू प्रसाद ( ईसीड ईर्मा ), बिक्षम गुज्जा (अॅग श्री, हैदराबाद ), उषा गणेश, अंशू भारतीय, मारुती चापके ( गो फॉर फ्रेश, मुंबई ), अजित कानिटकर ( विकासान्वेश फाऊंडेशन ) सहभागी झाले.

‘विकासक्षेत्रात संशोधनाची आवश्यकता’ या विषयावर डॉ. विजय महाजन यांचे बीजभाषण झाले. परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे 150 तज्ज्ञ उपस्थित आहेत. गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस), बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ), व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी आहेत.

परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ), श्रीजित मिश्रा हे मान्यवर सहभागी झाले आहेत .

ग्रामीण भारताशी संबंधित महत्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन’ ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले. देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले जात आहेत. शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस चर्चा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.