Lonavala : कुलस्वामिनी महिला मंच आयोजित मंगळागौर स्पर्धेला ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – संपर्क बालग्राम संस्था मळवली येथे कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने आयोजित मंगळागौर स्पर्धेला ग्रामीण भागातील महिला व महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी संगीता शेळके, वैशाली कामटे, सुमन गायकवाड, शुभांगी शिरसाट, भावना शेळके, पल्लवी शेळके, विनया शेळके, वृषाली टिळे, रेखा शेळके, ऋतुजा शेळके, कांचन शेळके, उज्वला शेळके यांच्यासह परिसरातील विविध गावातील महिला सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व महिला उपस्थित होत्या. मंगळागौर स्पर्धेत सुनील अण्णा शेळके एक नंबर या गाण्यावर ग्रामीण ज्येष्ठ महिलांनी ठेका घेतल्याने कार्यक्रमाला रंगत आली.

मंगळागौर स्पर्धेत जाखमात मंगळागौर, महालक्ष्मी मंगळागौर सदपूर, राणी लक्ष्मी मंगळागौर औढोली, सखी मंगळागौर पिंपलोली, ताजुबाई मंगळागौर व भारतमाता मंगळागौर ताजे, स्वामींनी मंगळागौर घरकुल, कुलस्वामिनी मंगळागौर देवले, जागृती महिला भाजे, मोगरा मंगळागौर व जाई जुई मंगळागौर पाटण, सक्षम मंगळागौर घेरेवाडी, जिजामाता मंगळागौर लोहगड, गौरीमाता मंगळागौर बोरज, वैभवशाली मंगळागौर बोराज या महिला गटांनी सहभाग घेतला होता. श्रावणी खराडे हिने सुनील शेळके यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले.

या स्पर्धेत जाखमाता मंगळागौर ग्रुप सदापूर अव्वल ठरला. उत्कृष्ट वेशभूषा, सादरीकरण व समन्वय या बक्षिसांसह उपस्थित महिलांना कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने औक्षण करून भेट वस्तू देत ओटी भरण्यात आली. संपर्क संस्थेच्या रत्ना बँनर्जी यांचा देखिल यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित शेवाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुलस्वामिनी महिला मंचच्या सदस्य व संपर्क संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.