Maval News: मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी ऋषीनाथ शिंदे 

0

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी टाकवे येथील ऋषीनाथ पांडुरंग शिंदे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे प्रमुख मार्गदर्शक चंद्रकांत सातकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली.

शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी कुस्तीची मैदाने गाजवली असून कुस्ती आखाड्यात उत्कृष्ट पंच म्हणून परिचित आहेत यासह टाकवे येथील मौलाली तालीम येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा पैलवान सध्या मातीवरील कुस्तीचे डावपेच शिकण्याचे धडे घेत आहेत.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त  पैलवानांना जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

निवडीचे पत्र देताना संभाजी राक्षे, राजू शिंदे, प्रकाश आगळमे, विष्णू सातकर, पैलवान बाबू खापे, नवनाथ हारपुडे, अमित असवले, अक्षय पिंगळे, निलेश कालेकर, प्रशांत शिंदे, प्रदीप शिंदे आदीजण उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III