Vadgaon Maval News : बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धेत दिनेश सातकर यांच्या रुस्तमचा पहिला क्रमांक

जांभुळ-सांगवीचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळ-सांगवीचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 20) भव्य बैल रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत दिनेश सातकर यांच्या रुस्तमने पटकावला. स्पर्धेत आदर्श गोटा विजेते दत्ता पिंपळे व भिकाजी वायकर यांना सन्मानित करण्यात आले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळ-सांगवीचे माजी सरपंच संतोष जांभुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि.20) भव्य बैल रॅम्प वाक स्पर्धेत प्रथम क्रमांक दिनेश सातकर (रुस्तम), द्वितीय क्रमांक दत्तात्रय बधाले (सर्जा राजा), तृतीय क्रमांक रोहित बच्चे (शिव), चतुर्थ क्रमांक नितीन म्हाळसकर (राजा पोपट), पाचवा क्रमांक सुभाष येवले (सर्जा राजा) उत्तेजनार्थ ऋषीनाथ पिंगळे (राजा हौस्या), अक्षय जांभुळकर (हरण्या चिक्या) व प्रदीप मोहिते (मुरलीधर व हनुमंत) आदींना बक्षीस देण्यात आले

आदर्श गोटा विजेते दत्ता पिंपळे व भिकाजी वायकर आदींना विभागून देण्यात आले. उत्तेजनार्थ सहादू आरडे व नंदकुमार काजळे आदींना बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात अनेक शर्यती गाजवलेले बैल त्यांच्या मालकांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी उपसरपंच मदन शेडगे यांचा पाखऱ्या. माजी उपसरपंच बाप्पू अण्णा सातकर यांचा लक्ष्या. सातकर ग्रुप कान्हे ऋषिकेश सातकर यांचा गोल्डन सोन्या आणि सल्लू. उद्योजक सनी सातकर यांचा सम्राट आणि बादल.

रॅम्पवॉक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-  फ्रिज. द्वितीय क्रमांक-  एलईडी टीव्ही.तृतीय क्रमांक -कुलर.चतुर्थ क्रमांक – फॅन. पाचवा क्रमांक – घड्याळ. व सर्वांना सन्मानचिन्ह. आदर्श गोठा प्रथम क्रमांक – रोख रक्कम पाच हजार व सन्मानचिन्ह. देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल अध्यक्ष सुभाषराव जाधव, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक गणेश काकडे, मा. ता. संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष नारायण ठाकर, मा. ता. राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक अंकुश आंबेकर, सरपंच विजय सातकर, ‘

माजी सरपंच प्रकाश आगळमे, सरपंच संतोष शिंदे, माजी उपसरपंच किशोर पं. सातकर, मा. ता. खरेदी विक्री संघ संचालक दत्तात्रय शिंदे, सरपंच नामदेव शेलार, माजी सरपंच गणेश लालगुडे, बंटी  लालगुडे, उद्योजक अनिल मालपोटे, सहादू आरडे, माजी उपसरपंच गणेश बोऱ्हाडे, माजी उपसरपंच दिनकर सातकर, माजी उपसरपंच बापू सातकर, माजी उपसरपंच महेश सातकर, भाऊसाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किशोर प्र.सातकर, उद्योजक भरत सातकर. स्वप्नील नवघणे, अमित नवघने, वैभव नवघने, प्रकाश पिंगळे, जांभूळ ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापून जांभुळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक स्वरूपामध्ये बैलांचा रॅम्पवॉक घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास जांभूळकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.