S Sreesanth : एस श्रीसंतला खेळायचं आहे आयपीएल, ‘या’ संघातून खेळायची दर्शवली इच्छा

S Sreesanth wants to play in IPL, his desire to play in this team केरळच्या रणजी संघात श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे.

एमपीसी न्यूज – स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला बीसीसीआय कडून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवल्यानंतर तो केरळच्या रणजी संघातून खेळणार आहे. 

आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला बीसीसीआय कडून दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे श्रीसंतचा पुर्नआगमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार केरळच्या रणजी संघात श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे. यासोबतच श्रीसंत आयपीएल खेळण्याबद्दलही सकारात्मक आहे. आयपीएल’च्या पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी मी नक्की माझं नाव देईन असं श्रीसंतने सांगितलं आहे.

श्रीसंत म्हणाला, मी  2021 च्या आयपीएल हंगामासाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या ड्रॉ मध्ये नक्कीच माझं नाव देणार आहे. मला कोणत्याही संघाने खरेदी केलं तरी मी त्या संघाकडून खेळायला तयार आहे. पण क्रिकेटचा चाहता म्हणून विचाराल तर मला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळायला आवडेल. त्याचं कारण आहे सचिन तेंडुलकर. मी मुळात क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याचं कारण मला सचिनला भेटायचं होतं. त्यांच्याकडून ड्रेसिंग रूममध्ये देखील खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी मुंबई इंडियन्सचं नाव घेईन. त्याशिवाय मला धोनीच्या नेतृत्वाखाली किंवा बंगळुरू संघातूनही खेळायला आवडेल, असे तो म्हणाला.

आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर 3 महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश बीसीसीआय’ला 15 मार्च 2019  रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डीके जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय बीसीसीआय  ने घेतला होता. त्यानुसार 20 ऑगस्ट 2019 ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.