Pimpri : साद देती हिमशिखरे; हिमालय सफरीचा अनुभव

एमपीसी न्यूज – बर्फाने झाकलेले उंच महाकाय डोंगर, हिमालयातील घरांचे आणि निसर्गाचे सौंदर्य प्रत्येक भारतीयाला खुणावते. असाच अनुभव पिंपरी (Pimpri) चिंचवड मधील ‘जान्हवी बेळगावकर’ यांनी घेतला. त्यांनी केलेल्या हिमालय सफरीचा अनुभव त्यांच्या शब्दात….

स्वच्छंद ट्रेक्स अँड टूर्सचे संचालक श्री बेळगावकर सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज निगडी म्हणजेच आमच्या कॉलेजमध्ये आले. हिमालय ट्रेकच्या संदर्भात व्हिडिओ आणि फोटोचे सादरीकरण केले. हिमालयातील फोटो आणि व्हिडिओ पाहता क्षणी आमच्या सगळ्यांच्या मनात हिमालयाबद्दलचे कुतूहल निर्माण झाले.

Pune : भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे गुरुवारी संस्कृत एकांकिकांचा ‌‘नाट्यानुकीर्तनम्‌‍’ महोत्सव

आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा सुरू झाली, कोण कोण येणार हिमालयात. सादरीकरण पालकांसमोरच झाले असल्यामुळे पालकांचाही ट्रेकला जाण्यासाठी विरोध नव्हता. एकूण 18 जणांचे हिमालयात जाण्याचे ठरले. बेळगावकर यांनी सुरुवातीला आम्हाला दुर्गा टेकडी येथे बोलावून घेतले. गिर्यारोहण म्हणजे काय याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली.

त्यानंतर आमच्या गिर्यारोहणाचा सराव दुर्गा टेकडी, घोरावेश्वर, सिंहगड इत्यादी ठिकाणी सुरू झाला. हा सराव करत असताना पाठीवर तीन ते चार किलो वजन घेऊन सराव केला जात होता. हे करत असतानाच आम्हाला गिर्यारोहणाबद्दल विलक्षण गोडी निर्माण होऊ लागली. याबरोबरच कधी एकदा हिमालयात जातो अशीही उत्सुकता वाढली.

शेवटी तो आनंदाचा दिवस उजाडला. 30 एप्रिल रोजी दर्शन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झालो. जाताना ट्रेनमध्ये भरपूर धमाल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली येथील एका हॉटेलमध्ये पोहोचलो. आंघोळ आणि विश्रांतीनंतर सायंकाळी वॉल्वोने पाच वाजता मनालीला जाण्यासाठी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मनालीला पोहोचणार होतो. पण वाटेत भूस्खलन झाल्यामुळे तीन तास एकाच ठिकाणी थांबावे लागले.

ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आला. बेस कॅम्पला जाण्यासाठी आम्हाला दोन ते तीन मोटारींची व्यवस्था करण्यात आली. घाटमाथ्याच्या रस्त्याने आम्ही ‘रुमसू’ या छोट्याशा खेडेगावात पोहोचलो. इथून वर जात असताना डाव्या आणि उजव्या बाजूने बर्फाचे डोंगर पाहायला मिळाले. तो क्षण मनाला विलक्षण आनंद देणार होता. तेथील व्यवस्थापकांनी आमच्या राहण्याची चांगली सोय केली होती. खोलीच्या बाहेर येताच समोर उंच बर्फाचे डोंगर दिसत असल्याने राहण्याची सोय प्रचंड आवडली.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग आणि रिव्हर क्रॉसिंग इत्यादींबाबत त्याच्या साहित्यासकट आम्हाला माहिती देण्यात आली. ते का करावे याचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले. त्यानंतर त्या हवेत आणि वातावरणात (Pimpri) समरस होण्यासाठी एका उंच डोंगरावर देखील नेण्यात आले. तेथील आमची जेवणाची व नाश्त्याची सोय अतिशय उत्तम होती.

नियोजनानुसार आम्ही आमची सॅक घेऊन बेस कॅम्प वरून कॅम्प एक म्हणजेच चिक्का कॅम्प येथे निघालो. आमच्या गिर्यारोहणाची सुरुवात खूप उत्साहात आणि आनंदात झाली. जाताना वाटेत वेगवेगळे पक्षी फुले, देवदार, पाईन अशी उंच झाडे पाहायला मिळाली. वाटेत स्वच्छ पाण्याचे झरे देखील वाहत होते. त्याचाही आम्ही आस्वाद घेतला. दुपारपर्यंत आम्ही सगळे कॅम्प 1 येथे पोहोचलो. बर्फाचे डोंगर आम्हाला खुणावत होते. कधी आम्ही तिथे पोहोचणार असे वाटत होते.

अखेर तो दिवस उजाडला सकाळी लवकर नाश्ता करून आम्ही हम्तापास समिटसाठी निघालो. वाटेत दगड धोंडे आणि बर्फाचे गोळे यांचा अडथळा येत होता. शेवटचा टप्पा चढायचा असल्यामुळे दम देखील खूप लागत होता. (Pimpri) अखेर तो क्षण आलाच सकाळी 11 च्या सुमारास हम्तापास समिटच्या जवळ पोहोचलो. विशेष म्हणजे आम्ही सगळे तेरा हजार फूट उंचावर तंदुरुस्त होतो.

ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आणि त्या क्षणाचा आनंद गगनात मावत नव्हता. चहूबाजूने बर्फाचे उंच डोंगर आणि मधोमध आम्ही होतो. आम्ही सगळे इतके भारावून गेलो की एकमेकांना बर्फाचे गोळे मारणे, बर्फात लोळणे असे क्रीडा प्रकार देखील आम्ही केले. आम्हाला परत निघायचे आहे याचे भान देखील राहिले नाही.

इतकेच नव्हे तर आम्ही भूक, तहान देखील विसरलो होतो. ते सर्व विहंगम दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात टिपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. त्यातच खालच्या कॅम्पला पोहोचताना वातावरण बदलले आणि एखाद्या पांढऱ्या पक्षाची पीसे अंगावर पडावे असे स्नोफॉल चालू झाले.

एकूणच सर्व अनुभव गाठीशी घेऊन आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. या सर्व गोष्टी डोळ्यात साठवून (Pimpri)आम्ही विमानाने परतीच्या प्रवासाला निघालो. पण घरी आल्यावर प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून जात होते आणि म्हणूनच ‘साथ देती हिमशिखरे’ हे न राहून वाटू लागले.

Pune : व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.