Maval News : गौरी गणपती सजावट स्पर्धेत सबाजी कुडले प्रथम; स्पर्धेतील सहभागींचा सन्मान

एमपीसी न्यूज – स्वयंभू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत करंजगाव येथील सबाजी कुडले प्रथम आले आहेत. तर माऊ येथील प्रमोद जगताप द्वितीय, गणेश जाधव – नाणे उकसान तृतीय, सुरेखा शिंदे – वडेश्वर चतुर्थ, निवृत्ती जाधव – कशाळ यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी स्पर्धकांसह स्पर्धेत सहभाग घेतलेल्या 110 स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 20 ते 25 स्पर्धकांनी आकर्षक देखावे, सजावट केली होती. यामध्ये घरसंसार, बैलगाडा शर्यत, केदारनाथ प्रतिकृती हे उत्कृष्ट देखावे होते. परीक्षक म्हणून दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश विनोदे, सुवर्णा राऊत, उमा शेळके, सविता भांगरे व विद्या मोहिते यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील शेळके, जिल्हापरिषद सभापती बाबुराव वायकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,  सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, सारिका शेळके, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनिल दाभाडे, सुवर्णा राऊत, अंकुश आंबेकर, नारायण ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे संयोजन शाम पवार, भानुदास कदम, अविनाश बधाले,  मंगेश जाधव, शंकर मोढवे, सोपान गोटे, नारायण थरकुडे, तानाजी पिंगळे, विकास ठाकर, वैभव पिंगळे, अविनाश भालेराव, कृष्णा भंडारी, विशाल चिमटे, भरत लष्करी, विश्वनाथ लष्करी, संकेत बधाले, दिपक पडवळ, दशरथ पवार, निलेश आलम, गोविंद मोरमारे, आदेश चतुर आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.