Wakad : सचिन भोसले प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर डांगे चौकात (Wakad) बुधवारी (दि.22) हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सचिन भोसले व आकाश हेगडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.23) परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे.

सचिन सुरेश सुरेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयदिप संपत माने, आकाश हेगडे, सनी चव्हाण, करण अहिर, अक्षय कास्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी सचिन भोसले हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा राग येवून भाजपाचे कार्यकर्ते जयदिप संपत माने, आकाश हेगडे, सनी चव्हाण, करण अहिर, अक्षय कास्तार यांनी संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवून मुद्दाम रस्त्यात आडवे उभे राहिले.

यावेळी फिर्यादी यांनी त्यांना हाताने बाजूला होण्याचा इशारा केला. याचा राग येवून आरोपीनी त्यांना रस्ता अडवून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ज्यामध्ये फिर्यादी सचिन भोसले यांचा खांदा निखळला तर सोबतचे कार्यकर्ते गोरक्षनाथ पाषाणकर यांनाही मारहाण करत त्यांचा पाय फ्रॅक्चर केला. दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतरही तक्रार दाखल कऱण्यात आली. याचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभय दाभाडे हे तपास करत आहेत.

Chakan : चाकण येथे कंपनीत दरोडा टाकणारे गजाआड, सिक्युरिटी गार्डनेच चोरी केल्याचे उघड

तर आकाश बापू हेगडे यांनीही वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.23) फिर्याद दिली असून त्यानुसार सचिन भोसले, त्यांची बायको, त्यांचा मुलगा, सचिन भोसले यांची चुलती, त्यांचा अंगरक्षक यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे त्यांचे मित्र सनी चव्हाण, करण अहिर, अक्षय कास्तार, प्रजु उर्फ प्रज्वल आवळे हे डांगे चौक येथे थांबले होते. यावेळी सचिन भोसले हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तेथे प्रसाचारासाठी आले. त्यांच्या प्रचाराच्या (Wakad) साऊंडचा आवाज कमी करायला सांगिताला म्हणून सचिन भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी व त्यांचे मित्र कसबेसे तिथून सुटून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला गेले असता सचिन भोसले, त्यांची पत्नी, मुलगा, चुलती व कार्यकर्ते पुन्हा फिर्यादी जवळ गेले व त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. या फिर्यादीच्या अवघड जागी मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही गुन्हे पोलिसांनी दाखल केले असून सध्या पोटनिवडणूकीचा प्रचार ही अटीतटीचा होत असल्याने राजकीय वर्तुळात तणावपूर्ण वातावरण आहे. यावेळी पोलिसांची परिसरात शांतता राखण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.