Cricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले मजेशीर उत्तर

Sachin Tendulkar doesn't want to play the first ball for 'this' reason, Sourav Ganguly gave an interesting answer जेव्हा सचिन चांगल्या लयीत नसायचा तेव्हाही त्याच्याकडे उत्तर तयार होतं.

एमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा नाही, याचे सौरभ गांगुलीने भन्नाट उत्तर दिले आहे.

बीसीसीआयच्या चॅनेलवरील ओपन नेट्स कार्यक्रमात सलामीवीर मयंक अग्रवाल याने दादा’ची व्हिडिओ मुलाखत घेतली. त्यात मयंकने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गांगुली म्हणाला की, सचिन नेहमी मला पहिला चेंडू खेळायला लावायचा हे खरं आहे. त्याला मी काही वेळा म्हणायचो की, मीच नेहमी पहिला चेंडू का खेळायचा? कधी तरी तू पण पहिला चेंडू खेळ. त्यावर त्याच्याकडे दोन उत्तर तयार असायची.

सचिन जर चांगल्या लयीत असेल, तर त्याचा तो फॉर्म कायम राहावा म्हणून तो नॉन-स्ट्राईकला जाऊन उभा राहायचा. जेव्हा सचिन चांगल्या लयीत नसायचा तेव्हाही त्याच्याकडे उत्तर तयार होतं. तो मला सांगायचा की तू पहिला चेंडू खेळ, कारण माझा फॉर्म फारसा चांगला नाहीये.

मी नॉन-स्ट्राईकला उभा राहतो आणि तुझा खेळ पाहतो. म्हणजे माझ्यावरचं दडपण कमी होईल, असं उत्तर गांगुलीने दिलं. त्याच्याकडे चांगला आणि वाईट अशा दोन्ही फॉर्मसाठी उत्तर होतं.

_MPC_DIR_MPU_II

मग काही वेळा मीच चलाखी करायचो. त्याच्या नकळत मी एक-दोन वेळा पटकन जाऊन नॉन-स्ट्राईकवर उभा राहिलो. त्यामुळे त्याला नाईलाजाने पहिला चेंडू खेळावा लागायचा. पण असं एक-दोन वेळाच घडल्याचं गांगुली म्हणाला.

सचिन तेंडूलकर आणि सौरभ गांगुलीने सलामीवीर जोडी म्हणून दमदार कामगिरी करत जगावर अधिराज्य गाजवले. या जोडीने 176 डावांत 47.55 च्या सरासरीने 8,227 धावा केल्या आहेत. इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्याप 6,000 धावांचा पल्लाही गाठलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.