Sachin Tendulkar : याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिनने पूर्ण केला होता 15,000 धावांचा टप्पा 

On the same day, master blaster Tendulkar completed the 15,000-run mark

एमपीसी न्यूज – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच दिवशी एकदिवसीय क्रिकेट मध्ये विक्रमी 15,000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. बेलफेस्ट मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची सिरिज खेळताना दुसऱ्या सामन्यात त्याने हा टप्पा पूर्ण केला होता. 

या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने उभारलेल्या 227 धावांचा पाठलाग करताना सचिनने 106 चेंडूत 13 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या होत्या. सचिन 32 व्या षटकात  बाद झाल्यानंतर युवराज सिंग आणि दिनेश कार्तिक या दोघांनी सामन्याला सावरत भारताला विजय मिळवून दिला होता.

सचिनने 15 नोव्हेंबर 1989  मध्ये कसोटी क्रिकेट मधून पदार्पण केले होते याचवर्षी 18  डिसेंबर रोजी त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळाला होता. विक्रमादित्य सचिनने 200 कसोटी सामन्यात 15,921 धावा केल्या आहेत तर 51 शतक ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यात देखील सचिन विक्रमी कामगिरी करत 49 शतक व 18,426 धावांचा डोंगर रचला आहे.

सचिनने 24 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत विविध विक्रमाने गवसणी घातली आहे. सचिन सहा वेळा विश्वचषक खेळाला असून त्यामध्ये 2011 सालच्या विश्वचषकाचा देखील समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like