Sachin Tendulkar : सचिनच्या आत्मकेंद्रीपणामुळे तो कधीच कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही – मदनलाल 

Sachin Tendulkar: Sachin's self-centeredness has never made him successful as a captain - Madanlal सचिन तेंडुलकर एक खेळाडू म्हणून महान आहे यात शंका नाही. मात्र, तो केवळ स्वतःच्याच कामगिरीबाबत गंभीर होता, असे निरीक्षण मदनलाल यांनी नोंदविले आहे.

एमपीसी न्यूज – सचिन तेंडुलकर एक खेळाडू म्हणून महान आहे यात शंका नाही. मात्र, तो केवळ स्वतःच्याच कामगिरीबाबत गंभीर होता, त्याच्या आत्मकेंद्रितपणामुळेच तो कधीच यशस्वी कर्णधार होऊ शकला नाही, अशा शब्दांत माजी कसोटीपटू व प्रशिक्षक मदनलाल यांनी सचिनच्या नेतृत्वातील अपयशाबद्दल मत प्रकट केले. 

सचिनकडे जेव्हा संघाचे नेतृत्व होते तेव्हा त्याची वैयक्तिक कामगिरी फारसी सरस होत नव्हती, त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण आहे, हे स्पष्ट जाणवत होते. जेव्हा त्याच्याकडून महंमद अझरुद्दीनक़डे नेतृत्व आले त्यानंतर खुद्द सचिननेही पुन्हा कधीही नेतृत्व घेण्याची तयारी दर्शवली नाही. तो एक खेळाडू म्हणूनच संघात राहणे पसंत करत होता. असे मदनलाल यांनी म्हटले आहे.

मदनलाल पुढे म्हणाले की, सचिनने प्रत्येक कर्णधाराला उत्तम सहकार्य केले. नवोदितांनाही सामावून घेतले पण तो स्वतः यशस्वी कर्णधार बनू शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने शतकांचे शतक साकार केले. एकदिवसीय सामन्यांत पहिल्यांदा द्विशतक फटकावणारा सचिन पहिलाच फलंदाज ठरला. सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तो जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज आहे यात शंका नाही. मात्र, तो कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही हे कोणीच नाकारणार नाही.

सचिन प्रत्येक सामन्यात 100 टक्के योगदान द्यायचा आणि हीच अपेक्षा तो संघातील सर्वांकडून करायचा. एक खेळाडू म्हणून तुम्ही स्वतःच्या कामगिरीबाबत आत्मकेंद्रीत राहिला तर त्यात वावगे काहीच नसते. मात्र,  तुम्ही कर्णधार असता त्यावेळी संघातील सर्व सहकारी खेळाडूंकडून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेत संघाला यश मिळवून द्यायचे असते. हे सचिनला कधीही जमले नाही. सचिनने त्याच्या कारकिर्दीत 25 कसोटी व 73 एकदिवसीय लढतीत संघाचे नेतृत्व केले. मात्र, यशाची टक्केवारी पाहिली तर मी जे सांगत आहे ते सिद्ध होते, असे मदनलाल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.