Pune : सदानंद मोरे यांच्या समितीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

एमपीसी न्यूज – सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकातील वादग्रस्त मजकुराची चौकशी करण्यासाठी तीन इतिहास तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून पांडुरंग बलकवडे, डॉक्टर गणेश राऊत यांचा समितीत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र आता सदानंद मोरे यांच्या नियुक्तीलाच संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. सरकारने नेमलेल्या डॉ. सदानंद मोरे समितला आमचा आक्षेप असून ‘डॉ. मोरे सरकारचीच तळी उचलताहेत, त्यामुळे आमचा मोरेंना ठाम विरोध आहे. अशी भमिक संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. 
दरम्यान, शासनाच्या एक भाषिक पूरक वाचन योजनेतील पुस्तकांमधील मजकुराची तपासणी करण्यासाठी तीन इतिहास तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर सुनील मगर यांनी दिली.

नागपूर येथील लाखे प्रकाशनाच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकांमधून संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत काही संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. तसेच प्रतिभा प्रकाशनाच्या गोविंद तळवळकर लिखित ‘संताचे जीवन प्रसंग’ या पुस्तकामधून संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नी संबंधी अवमानकारक मजकूर असल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे.
महापुरुष व संतांविषयी अवमानकारक उल्लेख असलेल्या अक्षराची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. आक्षेपार्ह पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करू नये तसे आदेशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शासनाने आक्षेपांच्या पडताळणीसाठी तीन इतिहास तज्ञांची समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून पांडुरंग बलकवडे, डॉक्टर गणेश राऊत यांचा समितीत समावेश करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.