Pimpri News : पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाचे सेफ्टी ऑडिट करावे – गजानन बाबर 

एमपीसी न्यूजपिंपरीचिंचवड पुणे शहरातील सरकारी कार्यालयाचे सेफ्टी ऑडिट करावे अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिकायांना संकटकाळी बचाव प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे

गजानन बाबर यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या कडे पत्राद्वारे हि मागणी केली आहे. काही सरकारी कार्यालयांना पर्यायी एक्झीट नाहीत तसेच, फायटिंग सिस्टीम योग्य सुरू आहे याची खातरजमा करणे गरजेचे आहे. वेळोवेळी मॉकड्रील घेणे आवश्यक असल्याचं बाबर यांनी पत्रात म्हंटले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची व पुणे महानगरपालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, एमआयडीसी कार्यालय, एलआयसी कार्यालय, वायसीएम रुग्णालय, पोलीस कार्यालय, पीएफ ऑफिस, महावितरणचे कार्यालय, विविध विमा कार्यालये, पासपोर्ट ऑफिस, शहरातील बसस्थानके, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, रेशनिंग कार्यालय, सहकारी संस्थांचे कार्यालय, साखर संकुल, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, ससून, औंध यासारखी मोठमोठी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी बाबर यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.