Bhosari : दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून सागरमाथाकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज –  सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या दिवंगत अध्यक्ष रमेश यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज शुक्रवारी  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.

गिर्यारोहण या साहसी खेळाबरोबरच सागरमाथाच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध गिर्यारोहक रमेश गुळवे मार्ग येथे रमेश गुळवे यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि संस्थेच्या सदस्यांसह सुमारे ५० जणांनी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. या स्वच्छता मोहिमेद्वारे या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी साफसफाई करून सुमारे ४० बॅगा प्लास्टिक व तत्सम कचरा जमा करण्यात आला.

सकाळी लवकर ६ वा या मार्गावरील नामफलका जवळ सर्वप्रथम स्वच्छता करण्यात आली. रमेश यांच्या वडिलांनी फलकास पूष्पहार अर्पण करून मोहिमेला सुरुवात केली. सुमारे ४ तास सलग ही स्वच्छता मोहीम चालू होती. मोहिमेची सांगता रमेश यांचे घरी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे समन्वयक गजेंद्र बटवाल व सुमित दाभाडे यांनी यावेळी सर्व नियोजन केले. तसेच मोहिमेसाठी संतोष फुगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.