Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात धनु राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. धनु राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

धनु : उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

राशीचक्रातील ही नववी रास असून अग्नि तत्वाची द्विस्वभावी पुरुष राशी असून या राशीचा स्वामी गुरु आहे. अत्यंत संवेदनशील, सात्विक, न्यायप्रिय, परोपकारी अंत:करणातील कोश सुप्त अवस्थेत असणारी, जीवनाबद्दल श्रद्धा, न्यायदेवताच्या निर्णयाप्रमाणे कर्म करणारी, परोपकारी, अधिकारांची हौस असणारी, न्यायी व धार्मिकता जपणारी व्यक्ती असते.

मुलांसाठी अथवा कुटुंबासाठी सदैव खर्च करणारी, वास्तू व वाहन सौख्याची आवड असणारी, हसतमुख व समाधानी धार्मिकतेची आवड, साधूसंत ऋषिमुनी सत्पुरुष, आचार्य महानयोगी या राशीवर जन्म घेणार्‍या व्यक्ती असतात. त्याचबरोबर प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सभ्यता, परोपकारी करणारी वृत्ती या राशीमध्ये असते.

अनेक मोठमोठ्या धार्मिक व अध्यात्मिक संस्थेवर ट्रस्टईवर सदस्य म्हणून काम करताना या राशीचे व्यक्ती आढळतात. समाजाचे आधारस्तंभ, दीपस्तंभ, मार्गदशर्र्क या दृष्टीने आपणाकडे, पाहिले जाते.

गरीब व दिनदुबळ्या लोकांबद्दल सहानुभूती, करूणा असते. लोकहिताचे निर्णयाला आपण प्राधान्य देत असल्यामुळे सामाजिक संस्था, हॉिस्पिटल, धार्मिक संस्था प्राण्यांसाठी गोशाळा अशा प्रकारच्या संस्था, धार्मिक मठ, याठिकाणी धनु राशीचे लोक हमखास सापडतील.

नवीन कल्पना, मूलगामी विचार परंपरा, इतिहास, रुढी, संस्कृती या विषयी धनू व्यक्तीच्या मनात आदर असते. क्रीडा क्षेत्रातही या राशीचे लोक चमकतात.

काही धनू राशीचे व्यक्ती कायदा सुव्यवस्था यामध्ये काम करताना न्याय व शिस्त यांचा ताळमेळ घालून तो कार्यभाग साधतात. त्यामुळे ते समाजप्रिय होतात. धनु राशीमध्ये मूळ पूर्वाषाठा उत्तराषा ही नक्षत्रे येतात.

धनु रास मूळ नक्षत्राची व्यक्ती सशक्त,दणकट, बलवान, धाडसी काही प्रमाणात चंचल स्वभावाची व एकांतप्रिय असतात. यांना मूळात श्रेष्ठत्व गाजविण्यास आवडते. इतर धनूरास पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती गर्विष्ठ, मैत्री कायम टिकवणार्‍या, बलवान, धनवान, सामान्य बुद्धीमताचा, पैशांचा, लोभ अशा असतात.

यांना आनंदी व सुस्वभाव यांची प्राप्ती होते. नोकरीची आवड असणारा तर लबाडीच्या व्यवहारात फसगत होणार असतो. तर धनुरास उत्तराषढा नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव आशावादी, महत्वकांक्षी, शिक्षणाची आवड असणारे तीव्र इच्छा शक्ती, शांत स्वभावाचे धार्मिक व नम्र असतात. तर धार्मिकता जपणारी व विचारांचा ताळमेळ साधून समाजात वावरतात.

धनु राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

आपल्या राशीच्या धनूस्थानी गुरुचे भ्रमण होत असून कौटुंबिक व आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्नात वाढ होईल. कमी श्रमात पैसे मिळतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

निवडणुकांमध्ये यश, लोकप्रियता वाढेल. बदल/बदली होईल. शेअरमार्केटसाठी नवे वर्ष चांगले राहील. आर्थिक गुंतवणूक चांगली होणार असून वडीलोपार्जित इस्टेटीतून आर्थिक लाभ होईल.

एप्रिल 2021 नंतर राशीच्या तृतीयस्थानी गुरुचे भ्रमण होणार असून जवळचे प्रवास घडतील. मित्रमंडळींपासून मदत/फायदा होईल. इच्छुकांचे विवाह ठरतील. तिर्थयात्रा, उच्च शिक्षणासाठी अनुकूल काळ. सामाजिक, धार्मिक संस्थेवर सदस्य म्हणून निवड होईल.

पुण्य कर्म, उपासना कराल. साधू संत यांचे दर्शन व भेटी होतील. तर शनिचे भ्रमण आपल्या धनस्थानातून होत असून साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू आहे. त्यामुळे आरोग्यामध्ये सुधारणा होईल. एकटेपणा दूर होईल.

विवाह समस्या दूर होतील. गुंतवणूकीवर भर राहील. काही जुनी येणी वसूल होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींकडून फायदा होईल. भावंडे/नातेवाईक यांना दिलेले पैसे परत मिळतील. जुने शास्त्र, गुढविद्या, साहित्य यातून आर्थिक प्राप्ती होईल. राजकी, सरकारी कामातून फायदा होईल.

पराक्रम कर्तृत्वाला संधी मिळेल. या काळात समाजावर आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यास हे वर्ष अनुकूल राहील. तर राशीच्या षष्ठ व व्यय स्थानातून राहूचे व केतूचे भ्रमण होत असून नोकरीमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.

दूर बदली, आरोग्याच्या दृष्टीने निदान लवकर न होणे, हाताखालच्या लोकांकडून फसवणूक, मोठे प्रवास रद्द होतील. चुकीच्या औषधांचा त्रास, एखाद्या खाण्यापिण्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता राहील. तर पंचम स्थानातील हर्षल अनपेक्षित लाभ करून देणारा राहील. मित्राचा लहरीपणा सहन करावा लागेल.

तृतीय नेपच्यून व धनस्थानी प्लूटो दृढ गुढशास्त्र अध्यात्म यामध्ये यश देणारा राहील. एकंदरीत धनसंचय वाढेल. तीर्थयात्रा होतील. मित्राकडून लाभ होतील.

उपाासना : श्री दत्त, शिवशंकर ची उपसना केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर महामृत्यूंजय जप केल्यास उत्तम राहील. दर शनिवारी तेल/लोखंड/उडीद शनिमंदिरात दान करावे.

शुभ रंग : चमकदार पिवळा, लाल, डाळिंबी.

भाग्यरत्न : अपण माणिक रत्नाचा वापर केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर टोपाझ या रत्नाचा वापर जरूर करवा.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30

भाग्यकारक वयोवर्ष : 18, 22, 34, 43, 54, 63

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.