Sahara old age home: सहारा वृध्दाश्रमात विधू विनोद चोप्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण 

एमपीसी न्यूज: अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या आंदर मावळमधील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात (Sahara old age home) बाॅलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

BRTS route: निगडी – दापोडी बीआरटीएस रूट वरील बीआरटी बस व बस थांब्यांवरील आयटीएमएस सिस्टिम बंद असल्याने प्रवाश्यांना त्रास

बाॅलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात ध्वजारोहण केले. सहारा वृध्दाश्रमाचा प्रथम वर्धापनही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच असल्याने या प्रसंगी त्यांची पत्नी अनुपमा, मुलगा अग्निदेव हे कुटूंबिय देखील उपस्थित होते.(Sahara old age home) आश्रमातील जोशी आजोबा व शिंदे आजोबा यांनी हिंदी चित्रपटातील देशभक्तीपर गीते यावेळी त्यांच्यासमोर गायली. सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.