Chinchwad : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे माझे आवडते शाहीर – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी  न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे माझे आवडते शाहीर असून त्यांचे साहित्य माझ्या संशोधनाचा विषय राहिला आहे. ही सृष्टी शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या तळहातावर उभी असल्याचे सांगितले. आपल्या साहित्यातून श्रमिकांचे मोल सांगणा-या अण्णा भाऊंनी श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामकृष्ण देखणे यांनी रविवारी (दि.1) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “गाथा लोकशाहीराची”, महामंडळाच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप, स्कॉर्लशीप वाटप आणि शासकीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामकृष्ण देखणे होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, महापौर राहुल जाधव, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. गिरीषजी आफळे, विनायक थोरात, मुकंदजी कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, नाट्य परिषदेचे अध्षक्ष भाऊसाहेब भोईर, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, सुजाता पलांडे, सोनाली लांडगे, नरसेवक शितल शिंदे, माऊली थोरात, बाबु नायर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, मधु जोशी, राजेश पिल्ले, विलास लांडगे, कामगार नेते यशवंत भोसले, मनोहर भिसे, अनुप मोरे, साहित्यिक राजन लाखे, प्रकाश ढवळे, विलास जेऊरकर, कैलास कुटे, प्रकाश जवळकर, पोपटराव हजारे, अजय साळुंके आदी  उपस्थित राहणार आहेत.

डॉ. रामकृष्ण देखणे पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे निधन आणि अण्णा भाऊंंचा जन्म दोन्हीचा दिवस 1 अॉगस्ट 1920 होता. हा दिवस महाराष्ट्रासाठी एक सुर्य अस्ताला जात असताना दुसरा उगवत असल्याचा होता. पर्वताला उतुंगता असते, पण अथांगता नसते. तर सागराला उतुंगता नसते, पण अथांगता  असते. ही उतुंगता आणि अथांगता अण्णा भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात होती. दीड दिवसाच्या शाळेत जाणा-या अण्णांनी 32 कांदब-या, 22 नाटकांसह विवध प्रकारचे  साहित्य निर्माण केले. साहित्यात त्यांनी कल्पनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्व दिले. स्त्रीयांची प्रतिष्ठा, दु:खितांची पीडा दूर करण्यासाठी आणि समाजातील शोषितांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या साहित्याचे 14 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. साम्यवादी विचारातून प्रभावीत होऊन हे विविध लिखाण केले.

रशियाशी अण्णा भाऊंचे नाते आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित प्रसंगही सांगितला. तर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधनासाठी अण्णा भाऊंनी “माझी मैना गावावर राहिली.. जिवाची होतीया काहिली..  माझी मैना.. माझी मैना… माझी मैना” ही छक्कड लावली केली. त्या लावणीत दडलेला  सामाजिक आणि राजकीय आशय डॉ. देखणे यांनी उपस्थितांना उलगडून सांगितला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, तळमळीचा आणि लोकांसाठी झगडणारा कार्यकर्ता अमित सर्वांना माहित आहे. पदाला न्याय देण्याची भूमिका घेऊन समाजाला मदत करून त्याला पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांच्यामार्फत सुरू आहे. अमित गोरखे यांनी सुचविल्या प्रमाणे देशाच्या संसदेत लोकसभेत अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी मी करणार आहे.

गिरीश आफळे म्हणाले की, समाज सुधारणे हाच उद्देश ठेवून अण्णा भाऊंसारख्या समाजसुधाराकांनी काम केले. ते त्यांच्या साहित्यातून आणि लिखाणातून दिसते. राष्ट्रासाठी आचरणात्मक शिकवण समाजा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली. त्यावेळी मांडलेली समरसतेची भुमिका आज सर्वांना पटलेली आहे. स्वातंत्र्याचा अतिरेक व समतेचा अतिरेक होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी घटनेत बंधुतेचा अंतर्भाव केला. बंधुतेचे नाते भारतात तयार झाले पाहिजे, हेच काम संघ करत आहेत.

प्रास्ताविक करताना अमित गोरखे म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षासाठी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला. अण्णा भाऊंचे काम खूप मोठ्या स्तरावरचे काम होते. या व्यक्तिमत्वाला भारतरत्न द्यावा, ही मागणी समाजाची होती. अण्णा भाऊंच्या नावाने पहिले एमपीएससी व युपीएससी सेंटर पिंपरीत सुरू करण्याची मागणी मान्य झाली आहे. तीन दिवसाचे साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. अण्णा भाऊ व लहुजी साळवे चित्रपटासाठी निधी मंजूर झाला आहे. समाजातील 100 विद्यार्थी महामंडळ युपीएससी व एमपीएससी परिक्षेसाठी दत्तक घेणार आहे. त्याची निवड प्रक्रिया लवकरच सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहराला त्याचा फायदा कसा होईल. महामंडळाचे कार्यालय पिंपरी-चिंचवडला आणण्याचा, येथे स्कील डेव्हलपमेंट सेंटर आणि पोलिस भरती पूर्वतयारी सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे अमित गोरखे यांनी सांगितले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, शहराच्या नावलौकिकात भर टाकणारे व सुसंस्कृतपणा जपण्याचे काम करणा-या लोकांची गरज आहे. तसेच कौतुक करावे, असे  व्यक्तीमत्त्वापैकी अमित गोरखे आहेत. साहित्य तयार होण्यासाठी संवेदनशीलता, दूरदृष्टी असावी लागते. टाटा, बिर्लांच्या घरात साहित्य तयार होत नाही.

सचिन पटवर्धन म्हणाले,  पिंपरी-चिंचवडमध्ये आता मोठा बदल दिसतो आहे. पुण्याच्या बरोबरीने आणि त्याहून पुढे पिंपरी-चिंचवडचे नाव घेतले जाते. महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर अमित गोरखे यांच्या निमित्ताने संधीचे सोने होताना आम्हाला दिसत आहे. राजकीय फायदा बाजुला ठेवून एक ध्येय म्हणून ते काम करत आहे. तळागाळातील वंचित लोकांना मदत करण्याचे काम करत आहे.

महापौर राहूल जाधव, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी विधानसभातील 30 गुणवंत कामगारांना अण्णा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप खुडे, जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज तोरडमल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.