Pimpri : संमेलनाच्या अध्यक्षपदी तुकाराम पाटील तर स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या रौप्य महोत्सवा निमित्ताने 30 सप्टेंबर 2018 ला खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मंगल कार्यालयात एक दिवसाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.त्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी मा.भाऊसाहेब भोईर आणि संमेलनाध्यक्ष पदी प्रा.तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी  भाऊसाहेब भोईर म्हणाले, गेली अनेक वर्ष आम्ही पिंपरी चिंचवडला सांस्कृतिक दृष्ट्या अग्रस्थान करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात हे संमेलन म्हणजे मला कार्य करायला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. परिसराचे नावलौकिक वाढावे ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे.

तुकाराम पाटील म्हणाले, या संमेलनात जास्तीत जास्त साहित्यिक व रसिकांनी सहभागी व्हावे. हे संमेलन एक आगळेवेगळे संमेलन असणार आहे.

राज अहेरराव म्हणाले आज पर्यत कुणी घेतले नाही असे सत्र या साहित्य संमेलनात असणार आहे.मंडळाच्याच आयोजित 26 वी श्रावणी काव्य स्पर्धा 2018 या 23 ऑगस्टला  झालेल्या कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. या वेळी स्पर्धेत आलेल्या 50 कविते मधून पारितोषिक प्राप्त 5 गझला संगितबध्द करण्यात येणार आहे व उत्कृष्ट सादरीकरण झालेल्या ५ कवितांना साहित्य संमेलनात सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत अध्यक्ष स्थानी इक्बाल खान होते,सूत्र संचलन माधुरी ओक यांनी केले व आभार राजेंद्र घावटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.