BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : साई सर करणार माउंट किलीमांजारो शिखर

आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला वाढदिवस, अनेकांचे पाठबळ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – बाल वयात मुले खेळ खेळण्यात दंग असतात. अत्तातर मोबाईल गेममध्ये व्यस्त असतात. कधी कधी टीव्ही आणि विविध प्रसारमाध्यमांच्या प्रसारित होणाऱ्या व्हिडिओ गेम्स, कार्टून नेटवर्क, पोके मोन, डोरे मोन यामधये स्वतःला इतके वाहून घेतात की इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. परिणामी मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. मात्र, काही मुले याला अपवाद असतात.

प्रत्येक मुलाला आई-वडील दरवर्षी त्याच्या वाढदिवशी विविध वस्तू भेट देत असतात. अन वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पण, असाही एक मुलगा आहे जो बाल वयातच देश सेवेचे स्वप्न अंगी बाळगून अतुलनीय धाडस करत स्वतःच्या वाढदिवशी आई-वडिलांना एक अनोखे भेट देण्यासाठी माउंट किलीमांजारो हे शिखर सर करणार आहे. 18 जानेवारीला याचा वाढदिवस आहे. अनोख्या व हटक्या पद्धतीने तो साजरा करणार आहे.

या जिगरबाज मुलाची ही कहाणी आहे. साई सुधीर कवडे (रा. पिंपळे निलख), वय वर्षे अवघे ९ बालेवाडीच्या भारती विद्यापीठ येथे इयत्ता चौथीत शिकत आहे. त्यास लहानपणापासूनच गिर्यारोहनाची आवड आहे. त्याने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ७० हुन अधिक गडकिल्ले पादाक्रांत केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आणि सर्वात अवघड किल्ला लिंगाणा ज्याचे नुसते नाव घेतले तरी अंगावर काटा येतो भले भले कसलेले गिर्यारोहक ही हा गड सर करण्यासाठी दहा वेळा विचार करतात. हा अशक्यप्राय असा गगनाला भिडलेला अभेद्य असा गड या चिमुकल्या मावळ्याने महाराजांचा वेश परिधान करून सर (चढाई) केला आहे. असे सह्याद्री रांगेतील अनेक ट्रेक त्याने लीलया पार केले आहेत. याच सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळूत हा चिमुकला मावळा देशसेवेच्या ध्येयाकडे वाटचाल करत कणखर बनला आहे.

या अनुभवातून त्याने लेह लडाख येथील अत्यंत कमी ऑक्सिजन असणारे भारतातील सर्वोच्च ट्रेकेबल शिखर स्टोक कांग्री हे देखील १६५०० फुट (५००० मिटर ) बेस कॅंपपर्यंत यशस्वी चढाई केली आहे, असे साहस करणारा तो भारतातील सर्वात लहान एकमेव मुलगा आहे. त्याच्या या साहसाची नोंद इंक्रेडिबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये सुध्दा झालेली आहे. तसेच जेष्ठ इतिहासकार आप्पा परब यांच्या हस्ते साईला किल्ले प्रतापगडावर मावळा हि उपाधी देउन गौरवण्यात देखील आले आहे. तरी याच सर्व अनुभवाने प्रेरणेने अजुन साहस दाखवत त्याची पुढील मोहीम दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर करणे आहे. या मोहीमेला जाण्यासाठी त्याचा नियमित विविध शारीरिक कसरती करत सराव चालु आहे. आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन साई भगवा ध्वज, राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगाण करणार आहे.

हे आहेत साथीदार
या मोहिमेत त्याला भक्कम पाठिंबा मिळाला तो म्हणजे अवघ्या 22 मिनिटात कोणत्याही साधनसामुगीचा वापर न करता लिंगाणा सर करणारा अनिल वाघ याचा तसेच एक पाय आणि एक हात जन्मताच अधू असलेला अकोला जिल्यातील दिव्यांग धीरज कळसाईत हा युवक त्याच्याबरोबर सहभागी असणार आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे जवान तुषार पवार हे देखील असणार आहेत. या मोहिमेत खास बाब म्हणजे या मोहीमेचे नेतृत्व कुमारी प्रियांका गाडे हि करणार आहे.

ओळख ‘माउंट किलीमांजारो’ची
माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशातील ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ हा पर्वत आहे. ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.

अशी आहे मोहीम
या मोहिमेसाठी हे सर्व जण येत्या 21 जानेवारीला मुंबई येथून टांझानियाला निघणार आहेत. 26 जानेवारीला भारताच्या गणराज्य दिनी भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचे अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज माउंट किलिमन्जरो या शिखरावर फडकविणार आहेत. या मोहिमेसाठी विशेष सहकार्य जेष्ठ गिर्यारोहक सुशिल दुधाणे करणार आहेत. मोहिमेस अर्थसाहाय्य धनंजय ढोरे आणि अमित पसरणीकर याचे कडून करण्यात आलेले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.