Saie Tamhankar Resumes Shooting : सई ताम्हणकर परतली सेटवर

Sai Tamhankar is back on set तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर पून्हा सुरू केले शुटिंग

एमपीसी न्यूज – मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने आज पासून  (सोमवार) चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

सई म्हणाली,  पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत.  एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा  सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे.

दिलेली कमिटमेंट पूर्ण करणा-यांमधली सई ताम्हणकर आहे, हे तिने ह्याअगोदरही दाखवून दिले आहे. बॉलीवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुख-या पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like