Taimur Ali Khan: जाणून घ्या तैमूर सैफला कोणत्या नावाने हाक मारतो ते…

Saif Ali-Karina: Find out what name Timur calls Saif ...

एमपीसी न्यूज – चित्रपटसृष्टीत कधी कुठल्या गोष्टींच्या चर्चा रंगतील याचा काही नेम नसतो. करीनाचा लाडका मुलगा तैमूर हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. अगदी त्याच्या तैमूर या नावापासूनच वाद सुरु झाले होते. त्यावेळी सैफ, करीनावर या नावामुळे बरीच टीका देखील झाली. पण आता त्यावर पडदा पडला आहे. आता लोकांना उत्सुकता असते ती तैमूर सध्या काय करतोय याची.

बऱ्याच वेळा सैफ आणि करीना मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांना तैमूरविषयी काही प्रश्न विचारले जातात.  सैफने नुकतीच एक मुलाखत दिली, या मुलाखतीत बोलत असताना त्याने तैमूर सैफला कोणत्या नावाने हाक मारतो याची गंमत देखील सांगितली.

तैमूर आता मोठा झाला असून तो बऱ्यापैकी बोलू लागला आहे. तो सैफला एका वेगळ्याच नावाने हाक मारतो. साधारणपणे मुलं आपल्या वडिलांना बाबा, पप्पा, अब्बा अशा काही नावाने हाक मारत असतात. मात्र तैमूर पप्पा किंवा डॅडी यापैकी कोणत्याचं नावाने बोलवत नाही, तो मला ‘सर’ म्हणून बोलावतो, असं सैफने सांगितलं. तैमूरला सांभाळणारी नॅनी, सैफला ‘सर’ म्हणून हाक मारते. छोट्या तैमूरने तिचंच अनुकरण करीत सैफला ‘सर’ म्हणायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.