Chandan nagar : लग्न झाल्याचे लपवून ‘सैफ’ने 22 वर्षीय तरुणीच्या डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी पळवून नेले

लव्ह-जिहादचा प्रकार असल्याची शक्यता..

एमपीसी न्यूज – पुण्यातील चंदन नगर (Chandan nagar) पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. लग्नाची आमिष दाखवून एका 22 वर्षे तरुणीला सैफ नामक आरोपीने पळून नेले.

Ashadhi Wari : पालखी सोहळ्या सोबत फिरते भांडार गृह

मात्र पळून गेल्यानंतर आपला प्रियकर विवाहित असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आपण परत येत असल्याचे आपल्या मैत्रीला फोन करून सांगितले. आपल्या मैत्रिणीला दिल्लीतील नोएडा येथील लोकेशनही पाठवले. मात्र ही तरुणी अद्यापही परतली नाही. त्यामुळे ही घटना लव जिहादचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चंदननगर पोलिसांनी सैफ (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयेश प्रभाकर भरसट (वय 23) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी तरुणी आणि ही 22 वर्षे तरुणी पेइंग गेस्ट मध्ये राहतात. या तरुणीचे एका सैफ नामक व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. आरोपी सैफ याने लग्न करण्याच्या आमिषाने तिला पळून नेले. परंतु, पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. तसे तिने आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगितले.
“सैफने तिच्या डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले असून तेथे बरेच लोक आहेत. मी तुम्हाला गुपचूप लोकेशन पाठवत आहे” असे सांगून या तरुणीने नोएडा दिल्ली येथील लोकेशन पाठवले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर चंदननगर (Chandan nagar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
https://youtu.be/bsCwhejfTA8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.