रविवार, जानेवारी 29, 2023

Thergaon News : सैनिक युवा फोर्स व विद्यार्थ्यांच्या कलागुण प्रदर्शनाद्वारे “सेना दिन” साजरा

एमपीसी न्यूज सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमी यांच्यावतीने रविवारी (दि.22) थेरगाव येथील कै मोरू महादू बारणे क्रीडांगण वनदेव नगर येथे (Thergaon News) सेना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल विजय वेसवीकर (भारतीय माजी सैनिक संघटना पुणे अध्यक्ष )व रिटायर्ड के इंदूप्रकाश मेनन (JWM ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड) होते.तसेच मदनलाल धिंग्रा यांचे वंशज जगमोहन धिंग्रा, सैनिक युवा फोर्सचे संचालक रामदास मदने कारगिल सहभाग उपसंचालक अशोक जाधव, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, एन एस जी कमांडो चंद्रकांत कडलग, अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मोहनिष बारिया, कृषी पुरस्कार विजेते कैलास जाधव, सेनेतील निवृत्त पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी वीर माता वीर पत्नी यांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला, तसेच वीरमाता व वीरपत्नी यांचा यथोच्छितरित्या सन्मान करण्यात आला. तसेच सोशल हॅंड्स फाऊंडेशन कडून साडी भेट देऊन वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला.

Pune Crime : पुण्यात 12 तासात दोन गोळीबाराच्या घटना

यावेळी पिंपर-चिंचवड मधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, गॅलेक्सी किड्स स्कूल, एस.पी इंग्लिश मिडियम स्कूल, जर्म्स न पर्ल्स स्कूल, ओर्किड इंग्लिश मिडियम स्कूल, संचेती हाय स्कूल व इतर शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांच्या वतीने संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

सैनिक युवा फोर्स पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांना प्रशस्तीपत्रक व मेडल देण्यात आले. सोलापुरातील जागतीक विक्रमवीर प्रशांत विजय (Thergaon News) उर्फ कवी प्रवि यांनी स्वरचीत हिन्दी कविता ‘तिरंगा यही मजहब हमारा’ सादर करून उपस्थित  मान्यवर आणि शिक्षक, विद्यार्थी व प्रेक्षकांची मने जिंकली. “वंदे मातरम “ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभद्रा फाउंडेशनच्या माधवी जनार्धन यांनी केले. सैनिक युवा फोर्स चे संचालक रामदास मदने यांनी आभार व्यक्त केले.

Latest news
Related news