Dehugaon : जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जूनला प्रस्थानाने प्रारंभ

25 जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये येणार तर 26 व 27 जूनला पुण्यनगरीत मुक्काम

एमपीसी न्यूज – जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार असून हा सोहळा 11 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

हा पालखी सोहळा 25 जूनला औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार असून 26 व 27 जूनला पालखी पूण्यनगरीत दोन दिवसाच्या मुक्कामासाठी पोहचेल. यंदा एकादशीचा मुक्काम लोणी काळभोर ऐवजी यवत येथे होईल. हा पालखी सोहळा 24 जूनला पाहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाडयात दाखल होईल. 25 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता इनामदार वाडयातून आकुर्डीकडे दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. 26 व 27 जूनला पालखी पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडूंगा विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी असेल. 28 जून रोजी लोणी काळभोर, 29 जून यवत, 3O जून वरवंड, 1 जुलै उंडवडी गवळयाची, 2 जुलै बारामती, 3 जुलै सणसर, 4 जुलै रोजी बिलवडी येथे पहिले गोल रिंगण व निमगांव केतकी येथे होऊन पालखी मुक्काम करेल.

त्यानंतर 5 जुलै इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम करेल. 6 जुलै सराटी, 7 जुलै माने विद्यालय येथे तिसरे गोल रिंगण व अकलूज येथे मुक्काम, 8 जुलैला माळीनगर येथे पाहिले उभे रिंगण व बोरगांव येथे मुक्काम, 9 जुलै तोडले बोंडले येथे धावा आणि पिराची कुरोली येथे येथे मुक्काम, 1O जुलै बाजीराव विहीर येथे उभे रिंगण व वाखरी  तळावर मुक्काम, 11 जुलै रोजी पालरवी पंढरपूरमध्ये मुक्कामासाठी पोहचेल, 12 जुलैला पालखी नगर प्रदक्षिणा करून प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी जाईल येथे पालखी 15 जुलै पर्यंत मुक्कामी असेल.

तर 16 जुलैला पालखी परतीच्या प्रवासाला सुरवात करील. 16 जुलै वाखरी, 17 जुलै महाळुंगे माकडाचे, 18 जुलै वडापूरी, 19 जुलै लासुर्णे, 20 जुलै बऱ्हाणपूर, 21 हिंगणगाडा, 22 वरवंड, .23 जुलै उरुळी कांचन, 24 हडपसर, 25 व 26 जुलै नवी पेठ विठ्ठल मंदिर पुणे येथे मुक्कामी असेल. 27 जुलै पिंपरी गांव आणि 28 जुलै रोजी दुपारी दोन वाजता पालखी सोहळा देहूत विसावेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.