Saira Banu Greets Lataji: जन्माष्टमीच्या निमित्ताने लतादीदींनी दिला गतस्मृतींना उजाळा

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना लतादीदी आपला भाऊ मानतात. या नात्याने त्यांच्या पत्नी दीदींच्या वहिनी होतात. म्हणून यावेळी सायराबानू यांनी लतादीदींना कृष्णभक्तीवर आधारित गाण्यातून शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीसी न्यूज- गानकोकिळा लता मंगेशकर या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकत्याच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा या माध्यमातून दिल्या होत्या. पण यावेळी खुद्द लतादीदींनाच त्यांच्या जिवलगांपैकी कोणीतरी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लतादीदी मेसेजमध्ये म्हणतात, आज माझ्या भाभीसमान असलेल्या अभिनेत्री सायराबानू यांनी मला एक संदेश पाठवला, ज्यात कृष्णजन्माष्टमीच्या मला आणि माझ्या परिवाराला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांना ब-याच दिवसांनी एक गाणे आठवले. ते त्यांनी शेअर केले आहे. तेच गाणे मी तुम्हा सर्वांसाठी शेअर करते आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लतादीदींच्या मानलेल्या वहिनी असलेल्या सायराबानू यांनी लतादीदींना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना लतादीदी आपला भाऊ मानतात. या नात्याने त्यांच्या पत्नी दीदींच्या वहिनी होतात. म्हणून यावेळी सायराबानू यांनी लतादीदींना कृष्णभक्तीवर आधारित गाण्यातून शुभेच्छा दिल्या आहेत.


शागीर्द या चित्रपटातील ‘कान्हा, कान्हा आन पडी तेरे द्वार’ हे नितांतसुंदर भक्तीगीत सायराबानू यांच्यावर चित्रीत झालेले आहे. त्याच गाण्यातून सायराबानू यांनी दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.