BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : सकल मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात रोखली रेल्वे

लोणावळा व ग्रामीण भागातील बाजारपेठ कडकडीत बंद

153
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता आज सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करत कोईम्बतूर मुंबई ही एक्सप्रेस गाडी दहा मिनिटे रोखून धरण्यात आली. ही गाडी मुंबईकडे रवाना झाल्यानंतरही सुमारे अर्धा तास आंदोलनकर्ते रेल्वे रुळ व स्थानकावर ठाण मांडून बसले होते.

9 आॅगस्ट या क्रांतीदिनाच्या निमित्त सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकरिता पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा, हाॅटेल, पेट्रोलपंप, शाळा, मह‍विद्यालये, उद्योग व्यवसाय, कारखानदारी बंद ठेवण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावर वाहने न आल्याने दोन्ही मार्गावर तसेच टोलनाक्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पाच कुमारकीच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करत आंदोलन सुरु करण्यात आले. शिवाजी महाराज पुतळा मार्गे जयचंद चौक, मावळा चौक येथून पायी मोर्चा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा येथे आणण्यात आला. या ठिकाणी काही मिनिटे रस्त्यावर ठाण मांडून आंदोलनकर्ते बसले. तदनंतर सर्व मोर्चेकरी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत साडेबारा वाजता मुंबईकडे निघालेली कोईम्बतूर एक्सप्रेस रोखून धरली. या आंदोलनानंतर समाजाचे सर्व कार्यकर्ते पुन्हा शिवाजी चौकात एकत्र जमत त्याठिकाणी रस्त्यावर संसार मांडला व जेवण बनवत पंगती बसविल्या. या सरकारमुळे आम्हाला रस्त्यावर संसार थाटण्याची वेळ आली असल्याचे यावेळी महिला भगिनींनी सांगितले. या आंदोलनानंतर काही युवकांनी चौकात मुंडन करत सरकारचा निषेध नोंदविला तर वारकरी बंधूंनी चौकात भजन म्हणत आरक्षण‍ची मागणी केली.

 

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3