Tennis Premier League : साकेत, ऋतुजा करणार पुणे जग्वारचे प्रतिनिधीत्व

एमपीसी न्यूज : साकेत मैनेनी आणि स्थानिक खेळाडू ऋतुजा भोसले टेनिस प्रिमियर लीगमध्ये पुणे जग्वार संघाचे प्रतिनिधीत्व करतील. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पुनित बालान आणि अभिनेत्री पुनित बालान या संघाचे सह मालक आहेत.

ही स्पर्धा या वर्षा अखेरीस मुंबईत होणार आहे. या लीगसाठी आज मुंबईत सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथे झालेल्या लिलावात पुणे फ्रॅंचाईजीने साकेतला ४.४० लाख रुपयाला खरेदी केले. लिलावासाठी अ श्रेणीतील खेळाडूंची पायाभूत किंमत २.५ लाख निश्चित करण्यात आली आहे.

त्याचवेळी पुण्याने ऋतजासाठी ३ लाख रुपये मोजले. त्याचवेळी सध्या पुणे येथे सुरू असलेल्या १५ हजार डॉलरच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या इशाक इक्बाल यालाही त्यांनी आपल्या संघात स्थान दिले आहे.

टेनिस प्रिमियर लीगच्या तिसऱ्या टप्प्यात साह आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये जागितक क्रमवारीत २०६व्या स्थानावर असणारी  ग्रेट ब्रिटनची सॅमंथा मरे शरण, २६२व्या स्थाावरील लॅटवियाची डायना मार्सिनकेविका, २९४व्या स्थानावरील थायलंडची पींगटार्न प्लीपुएच, ३१७व्या स्थानावरील उझबेकिस्तानची सबिना शारीपोवा, ३७९व्या स्थानावर युक्रेनची व्हॅलेरिया स्ट्राकोवा, ३८८व्या स्थानावरील जॉर्जियाची सोफिया शापाटावा यांचा समावेश आहे.

लिलावामध्ये सर्वाधिक बोली भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू रामकुमार रामनाथन याला लागली. त्याला ४.५ लाख रुपये जेत मुंबई लिओन आर्मीने खरेदी केले. भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस ा संघाचा सहमालक आहे. भारताचा सध्याचा अव्वल मानांकित खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनला राजस्थान टायगर्स संघाने ३.४० लाख रुपयांना खरेदी केली. भारताचा दुहेरीतील आघाडीचा खेळाडू दिवीज शरण याला गुजरात पॅंथर्सने ४.१० लाख रुपये मोजले. पूरव राजा ३ लाख रुपयांना चेन्नई स्टॅलिन्सकडे गेला.

महिलांमध्ये सर्वाधिक बोली भारताची अव्वल मानांकित अंकिता रैना हिला लागली. तिला ४.१० लाख रुपयंना हैदराबाद स्ट्रायकर्सने खरेदी केले.

संघ निवडताना प्रत्येक संघ मालकाला दोन पुरुष आणि एक महिला खेळाडू घेणे बंधनकारक आहे. संघातील दुसरा पुरुष आणि महिला खेळाडू हा टॅलेंट डेज द्वारे ठरणार आहे. यासाठी जून महिन्यात लढती होतील.

लीगमधील आठ फ्रॅंचाईजी मालकांसह सह मालक लिएंडर पेस, रकुल प्रित सिंग, सोनाली बेंद्रे आणि दिव्या खोसला कुमार या वेळी आपल्या संघांसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी उपस्थित होते. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची उपस्थितीही विलक्षण होती. ते नेहमीच या लीगच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्याचबरोबर चेन्नई स्टॅलिन्स संघाचे एक पुरस्कर्ते असलेल्या बॉडी फर्स्ट कंपनीचे मालक आणि अभिनेता सुनिल शेट्टी देखील या वेळी उपस्थित होते.

या लीगचे सर्वेसर्वा कुणाल ठाकूर आणि मृणाल जैन यांनी या वर्षी ही स्पर्धा नक्कीच रोमहर्षक होईल असा विश्वास व्यक्त केला. ही लीग यशस्वी करण्यासाठी टेनिस क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती पुढे येत आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. सर्व संघ मालक आणि प्रायोजक यांनी आमच्यावर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ही लीग म्हणजे एक सुरवात आहे. भविष्यात ही लीग भारतातील प्रमुख होईल असाच विश्वास या प्रत्येकाने व्यक्त केला, असेही ठाकूर याांनी सांगितले.

सहमालक लिएंडर पेस म्हणाला, ‘लीगला सुरवात झाल्यापासून दरवर्षी लीगची प्रगतीच होत आहे. लीगच्य या तिसऱ्या मोसमासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. लीगमध्ये आठ बलवान संघ असून, आम्हाला गेली दोन वर्षे चांगला पाठिंबा मिळाला. त्या जोरावर यावर्षी लीग अधिक उत्साहात पार पडेल असा मला विश्वास आहे.’

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून आत्मविश्वासाने उभी राहिलेली अभिनेत्री आणि पुणे जग्वार संघाची सह मालक सोनाली बेंद्रे म्हणाली,’टेनिस लीगच्या तिसऱ्या मोसमाची घोषणा झाल्यापासून मी कमालीची प्रेरित झाली आरहे. देशात टेनिस खेळाची चांगलीच प्रगती हवोत आहे. या लीगच्या निमित्ताने देशातील टेनिसपटूंना एक वेगळे व्यासपीठ मिळेल. पुणे गेल्या वर्षीचे विजेते आहेत या वेळी त्याच उत्साहाने नव्या जोमाने आम्ही विजेतेपद टिकविण्यासाठी उतरू.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.