Saksham Dance Programme : 30 जून रोजी ‘सक्षम’ नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मेघना साबडे प्रस्तुत ‘ सक्षम’ या नृत्य कार्यक्रमाचे (Saksham Dance Programme) आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नृत्यांजली अकॅडमी आणि अभिव्यक्ती कथक नृत्यसंस्थेतील शिष्यांचे सामूहिक भरतनाट्यम,कथक नृत्याचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. सुदीक्षा अनंतरमन यादेखील भरतनाट्यम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवार, 30 जून 2022 रोजी सायंकाळी 06.15 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 127 वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली. नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सक्षम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन (Saksham Dance Programme) मेघना साबडे यांनी केले आहे.

Dehu Road News : स्कुल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक, श्रीजीत रमेशन यांची पोलिसांत तक्रार

Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.