Nigdi : कोयत्याने वार करून सेल्समनचा खून

एमपीसी न्यूज – टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास अजंठानगर येथे घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

नंदू चव्हाण (वय 39, रा. सांगवी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू सेल्समन म्हणून काम करतो. दुपारी तीनच्या सुमारास तो अजंठानगर येथील हुंदाई शोरूमच्या मागच्या बाजूला एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला होता. सिगारेट पित असताना एका दुचाकीवरून दोघेजण आले. अचानक त्यांनी चव्हाण वर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. निगडी पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.