Salman Khan News : ईदच्या मुहुर्तावर येणार सलमानचा ‘राधे’

एमपीसी न्यूज: बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सलमान खानने त्याच्या ट्विटर हॅंडलवरून केली आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्मसने केली असून दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे.

‘चित्रपटगृह मालकांशी परत बोलायला मला उशीरच झाला, त्याबद्दल क्षमस्व…या काळात कोणताही निर्णय घेणे हे अवघड आहे. चित्रपटगृहांचे मालक, वितरक हे आर्थिक समस्यांतून जात असून मला याची जाणीव आहे. आणि म्हणूनच माझा राधे चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करून मला त्यांना मदत करायची आहे. याच्या बदल्यात त्यांनी सिनेमा बघायला येणा-या प्रेक्षकांसाठी योग्य त्या सर्व उपाययोजना योजून काळजी घ्यावी. ईदची कमिटमेंट दिली होती आणि ती ईद 2021च राहणार आहे. ईदच्या या मुहूर्तावर ‘राधे’चा आनंद घ्या. देवाची इच्छा’., असे ट्विट करत सलमानने ही घोषणा केली आहे.

या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ आदी कलाकार आहेत. 2020मध्ये नियोजित वेळेपूर्वीच राधे- युअर मोस्ट वॉंटेंड भाईचं शूटींग पूर्ण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.