Salman Khan : सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचे धागेदोरे कॅनडापर्यंत

एमपीसी न्यूज – बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील ( Salman Khan ) घरावर रविवारी (दि. 14) पहाटे गोळीबार झाला. यानंतर मुंबई पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली आणि पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचे धागेदोरे शोधून काढले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे तेहत कॅनडा पर्यंत गेले असून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचा या प्रकरणात हात असल्याचे म्हटले जात आहे.

रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने पाच ते सहा राउंड फायर केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, सायबर पोलीस, फॉरेन्सिक टीम सलमानच्या घराजवळ दाखल झाल्या.

Loksabha Election 2024 : युपीआय व्यवहारांवरही निवडणूक आयोगाची करडी नजर

दरम्यान, आरोपींनी वापरलेल्या दुचाकीची माहिती पोलिसांनी काढली आहे. ती जुनी दुचाकी आरोपींनी रायगड जिल्ह्यातून खरेदी केली होती. ती दुचाकी त्यांनी गोळीबाराचा गुन्हा करण्यासाठी वापरली असल्याने पोलिसांनी दुचाकी खरेदी विक्री प्रकरणातील लोकांची चौकशी सुरु केली आहे.

या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने स्वीकारली ( Salman Khan )असल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. त्याचाही मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पाठपुरावा केला असता त्या पोस्टचा आयपी ॲड्रेस  कॅनडा येथील असल्याचे समोर आले आहे. मात्र हा आयपी ॲड्रेस  कॅनडा येथील दाखवत असले तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाल्याची शक्यता लक्षात घेत पोलीस तपास करीत आहेत.

रविवारी मुंबई पोलिसांनी अनेक पथके दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना केली आहेत. एका आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. विशाल राहुल उर्फ कालू याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशाल याच्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो हरियाणा मधील गुरुग्रामचा रहिवासी आहे.

सन 1998 मध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान खान याने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या समाजातून येतो त्या समाजात कळविटांना देवाचा दर्जा आहे. त्यामुळे बिष्णोई टोळीकडून सलमान खानला धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. आता सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला ( Salman Khan ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.