Salman working in paddy fields: काय भाईजान आणि चक्क शेतात भात लावणी…

Salman Khan working in paddy fields निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर तो फार्महाऊसची साफसफाई करताना दिसला. त्यानंतर सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर सलमान फार्महाऊसवर फिरत असल्याचा फोटो शेअर केला होता.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे देशात उद्भवलेल्या आणीबाणीमध्ये अनेक सेलिब्रेटी आपापल्या फार्महाऊसवर आहेत. भाईजान म्हणजेच सलमानखान देखील त्याच्या पनवेलजवळील फार्महाऊसवर लुलीया वंतुर आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह होता. काही दिवसांपूर्वी जॅकलीन मुंबईत परत आली. पण सलमान मात्र फार्महाऊसवरच आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवताना दिसत आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडिओ, फोटो शेअर करत असतो. या लॉकडाउनच्या काळातदेखील तो इन्स्टाग्राम, ट्विट आणि फेसबुक यांच्या माध्यमातून त्याचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. यात त्याने शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो शेताच्या मधोमध उभा असून शेतात भात लावणी करताना दिसत आहे.

‘दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान’, असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान फार्महाऊसवर पावसाचा आनंद घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.


त्याआधी निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर तो फार्महाऊसची साफसफाई करताना दिसला. त्यानंतर सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर सलमान फार्महाऊसवर फिरत असल्याचा फोटो शेअर केला होता.

सलमान लवकरच राधे या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like