Salman Murder Plot: धक्कादायक! सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस

Salman Khan's assassination plot exposed सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती.

एमपीसी न्यूज – भाईजान सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या गुन्हेगाराला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराचं नाव राहुल असून क्राइम ब्रँचने 15 ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे खुलासे केले.

आरोपी राहुल उर्फ सांगा हा जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन गेला होता. त्यावेळी त्याने सलमानच्या घराची संपूर्ण रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती.

लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई हा जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांचे आरोप आहेत. पोलिसांनी 24 जूनला फरीदाबादमध्ये एका व्यक्तीच्या खुनाचा तपास करताना राहुलला अटक केली होती. तसेच गँगच्या इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान सलमानच्या खुनाचा कट रचला जात असल्याचा राहुलने उलगडा केला. त्यांने सांगितले की, त्याला जोधपूरच्या तुरुंगात कैद असलेल्या कुख्यात गँगस्टर लारेंस बिश्नोईने मुंबईला जाऊन सलमानची पाहणी करण्यास सांगितले होते.

मारण्याची प्लॅनिंग नंतर केली जाणार होती, पण त्याआधीच करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला. डिसेंबर 2019 मध्ये राहुल उर्फ बाबानेच दिल्लीमधून गुंड नरेश शेट्टीला पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कस्टडीतून पळवले होते.

लॉरेंस बिश्नोईने हरणाच्या शिकारीवरुन यापूर्वीही सलमानला मारण्याची धमकी दिली होती. यामागे एक कारण आहे. कारण हे की, राजस्थानमधील बिश्नोई समाज काळ्या हरिणाची पूजा करते. सलमान खानवर काळ्या हरणाला मारण्याचा आरोप आहे.

सलमानविरोधात बिश्नोई समाजाने खटला दाखल केला आहे. लॉरेंस स्वतः बिश्नोई समाजातील आहे, यामुळेच त्याचे सलमानसोबत शत्रुत्व आहे. यापूर्वी जून 2018 मध्येही लॉरेंसने आपल्या जवळच्या कुख्यात गुंड संपत नेहराला सलमानच्या मागावर पाठवले होते. पण, त्यावेळेसही प्रयत्न फसला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.