Nisarg Cyclone- ‘निसर्गा’ने सलमानला देखील झोडपले, पनवेलमधील फार्महाऊसलाही ‘निसर्ग’चा तडाखा

Salman Khan’s Panvel farmhouse impacted by Cyclone Nisarga

एमपीसी न्यूज- सुमारे शंभर वर्षांनंतर मोठ्या तीव्रतेने अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’हे भयंकर चक्रीवादळ बुधवारी, ३ जूनला दुपारी श्रीवर्धनजवळ धडकले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. याचा तडाखा प्रामुख्याने रायगड जिल्ह्याला बसला. सलमानखान याचे फार्महाऊस पनवेल येथे आहे. किनारपट्टीला धडकलेल्या या चक्रीवादळाने पुढे आगेकूच करताना सलमानच्या फार्महाऊसला देखील तडाखा दिला.

सध्या सलमान फार्महाऊसवरच असून तेथे त्याच्यासोबत राहत असणाऱ्या लुलिया वंतूर हिने सोशल मीडियावर फार्महाऊसमधील काही फोटो व व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

यात सलमानसह इतर सर्वजण स्वच्छता करता दिसत आहेत. तसेच फार्महाऊसच्या परिसरातील झाडांची पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे.


‘आयुष्य हे सुरुच राहतं.. सर्वांना पुन्हा सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी सूर्य उगवला आहे’,असं म्हणत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या या फार्महाऊसमध्ये सलमानसोबत लुलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, आयुष शर्मा व सलमानचा भाचा असे अनेकजण राहत आहेत.

लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त हे सर्वजण एकत्र जमले होते. मात्र तेव्हाच लॉकडाउन जाहीर झाल्यावर हे सर्वजण तिथेच अडकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.