Salman’s appeal to his fans: ‘भाईजान’चे सुशांतच्या चाहत्यांना प्रत्युत्तर न देण्याचे भावनिक आवाहन

Salman's appeal to his fans: Bhaijaan's emotional appeal to Sushant's fans not to reply भाईजान सलमानने त्याच्या चाहत्यांना सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांना आणि फॅन्सना पाठिंबा देण्याचे सोशल मिडियावरुन आवाहन केले आहे.

एमपीसी न्यूज – भाईजान सलमानने त्याच्या चाहत्यांना सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांना आणि फॅन्सना पाठिंबा देण्याचे सोशल मिडियावरुन आवाहन केले आहे. मागील रविवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने गळफास घेऊन जीवन संपवले. त्यानंतर बॉलिवूडमधील राजकारण, घराणेशाही यावरुन बराच गोंधळ झाला. अनेक चाहत्यांनी बॉलिवूडमधील प्रस्थापित अभिनेत्यांना यावरुन ट्रोल केले.

याच अनुषंगाने सलमानने आपल्या फॅन्सना आवाहन केले आहे. ‘माझी माझ्या फॅन्सना विनंती आहे की त्यांनी सुशांतच्या पाठीराख्यांना प्रत्युत्तर देऊ नये. तसेच त्यांना ट्रोलदेखील करु नये. या उलट त्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या भावना लक्षात घ्याव्या. ही वेळ वाद घालण्याची नाही याची जाणीव ठेवा. आपल्या एखाद्या जवळच्या माणसाचा मृत्यू हा खूप दुख:दायक असतो याचे भान ठेवा’, असे सलमानने त्याच्या पाठिराख्यांना सुनावले आहे.

सुशांनच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर #JusticeForSushantSinghRajput, #BoycottSalmanKhan, #BoycottStarKids and #BoycottBollywood असे हॅशटॅग जोरात सुरु आहेत. सलमानच्या फॅन्सनी त्याला प्रत्युत्तर म्हणून # WeStandWithSalmanKhan हा हॅशटॅग सुरु केला आहे.

तसेच मुंबई पोलिसांना सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याचे सांगितले आहे.  तसेच त्यांचा पुढील तपास सुरु आहे. अनेकांना हा आरोप केला होता की बॉलिवूडमधील प्रस्थापितांनी सुशांतला येथे स्थिर होऊ दिले नाही. त्याला कायम एकाकी टाकले.

पोलिसांनी या संदर्भात १४ व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. त्यात सुशांतचे वडील, त्याच्या दोन बहिणी, मित्र आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानी, मॅनेजर संदीप सावंत, मित्र आणि अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा, बिझीनेस मॅनेजर श्रुती मोदी, पब्लिक रिलेशन्स मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री आणि मैत्रीण रिया चक्रवर्ती, किल्लीवाला आणि त्याचे दोन सहकारी यांचा समावेश आहे. कोणीही कुटुंबीय किंवा मित्रांनी कोणताही संशय व्यक्त केला नसल्याचे तपास अधिका-यांनी ओळख उघड न करु देण्याच्या अटीवर सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.