Chikhali News : सलून चालकाने कामाचे 20 रुपये मागितले म्हणून सलूनची तोडफोड

एमपीसी न्यूज दोघांनी सलूनमध्ये चेहरा फ्रेश करून घेतला मात्र त्याचे 20 रुपये सलून चालकाने मागताच त्यांनी सलूनचालकाला मारहाण करत सलूनचीच तोडफोड केली.(Chikhali News) हा प्रकार चिखलीतील ट्रेंडस सलून येथे मंगळवारी (दि.21) सायंकाळी घडली.

 

याप्रकरणी भुषण लक्ष्मीकांत महाले (वय 26 रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात पोलिसांनी आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय 22 रा.चिखली) याला अटक केली असून आदित्य शिंदे (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Pune News – गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चौक’ चित्रपटाची तारीख जाहीर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या सलूनमध्ये काम करत असताना आरोपी तिथे आले व त्यांनी चेहरा फ्रेश करून देण्यास सांगितला. (Chikhali News)  फिर्यादी यांनी त्यांना चेहरा फ्रेश करून दिला व कामाचे 20 रुपये मागीतले. यावेळी आरोपी फिर्यादीला म्हणाले की, तु माझ्याकडे पैसे मागतोस, तु आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो असे म्हणून फिर्यादिला मारहाण केली. तसेच बाहेर जाऊन लोखंडी पाईप आणत पाईपने सलूनच्या काचा फोडल्या व सामानाची नासधुस केली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.