Lifestyle : लॉकडाऊनमध्ये सलून बंदच! नागरिकांमध्ये वाढली ‘टक्‍कल’ची क्रेझ

Salons closed in lockdown 'Bald' craze increases among the citizens.

0

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी केशकर्तनालय सुद्धा बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत डोक्यावर वाढलेल्या केसांच करायचे काय?

यावर घरगुती उपाय काढत नागरिकांनी घरीच टक्कल करण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या दाढी आणि डोक्यावरील केसाचं करायच काय असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

देशात सर्वत्र केशकर्तनालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे नागरिकांनी यावर शक्कल लढवून घरीच टक्‍कल करण्यास सुरुवात केली आहे. शहरात आता सर्वत्र टक्कल’चीच क्रेज दिसू लागली आहे.

दिवसेंदिवस वाढणारा लॉकडाऊनाचा आता चौथा टप्पा सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या रूग्णसंख्येमुळे कोरोनाचे संकट कधी संपेल सांगता येत नाही तसेच लॉकडाऊनाची मुदत सुद्धा वाढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे डोक्‍यावरील अती वाढलेल्या केसांमुळे वाढलेल्या त्रासाला कंटाळून अनेकांनी घरच्या घरीच टक्कल करण्याचा पर्याय शोधला आहे.

केशकर्तनालय शोधण्यापेक्षा घरच्या घरीच टक्कल केले की निदान चार ते पाच महिने केसांची कटकटच राहणार नाही. म्हणून अनेकांनी घरीच ‘टक्कल’ करण्याचा पर्याय निवडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like