Amul’s Creative Add: ‘अमूल’चा क्रिएटिव्ह जाहिरातीतून ‘बिग बीं’ना सलाम

Salute to 'Big B' from Amul's creative advertisement अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अभिषेक, ऐश्वर्या व त्यांची मुलगी आराध्या यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या.

एमपीसी न्यूज – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोनातून मुक्त होऊन हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्याआधी काही दिवस ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. आता फक्त अभिषेक नानावटी हॉस्पिटलमध्ये असून तो देखील लवकरच घरी परतेल.

अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अभिषेक, ऐश्वर्या व त्यांची मुलगी आराध्या यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र सुरुवातीच्या काळात अमिताभ आणि अभिषेक नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते.

ऐश्वर्या व आराध्या घरीच उपचार घेत होत्या. पण सुमारे आठवड्यानंतर त्या दोघींना देखील रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर ऐश्वर्य़ा व आराध्या यांना डिस्चार्ज दिला. अमिताभ यांना डिस्चार्ज देण्याची अफवा देखील सोशल मीडियावर उठवण्यात आली होती.


अमिताभ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची भारताचा अग्रगण्य ब्रँड अमूलने एक भन्नाट आणि क्रिएटिव्ह जाहिरात केली आहे. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी खूप मोठा आशय व्यक्त केला आहे. ‘AB Beats C…’ एवढ्याच मोजक्या शब्दात लोकांच्या मनातील भावना या जाहिरातीतून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

सध्या संपूर्ण जगभर थैमान घालणा-या त्या कोरोनाच्या विषाणूने सर्वसामान्यांबरोबर सेलिब्रेटी, राजकीय नेते यांना देखील आपला हिसका दाखवला आहे. मागील सुमारे पाच महिन्यांपासून संपूर्ण जगातील सर्व व्यवहार या एवढ्याशा विषाणूने ठप्प करुन टाकले आहेत. याची साथ सुरु झाल्यावरच या विषाणूची लागण होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी याच्या विविध जाहिराती अमिताभ यांनी केल्या होत्या.

लोकमानसातील अमिताभ यांची प्रतिमा बघता त्यांनी लोकांना आवाहन केले की ते लोक ऐकतील असे वाटल्याने विविध माध्यमांतून अमिताभ यांनी आवाहन केले. तसं पाहता संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतातील ही साथ सुरुवातीला खूपच आटोक्यात होती. आजही रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण भारतात इतर देशांच्या तुलनेत लक्षणीय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.