Bhosari news: नाशिकमधील 250  फूट उंच असलेल्या नवरी सुळक्यावर चढाई करून कोरोना योद्ध्यांना सलाम !

जिजाऊ जयंतीचे साधले औचित्य

0

एमपीसी न्यूज – गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महराष्ट्रातील नाशिक मध्ये असणारा 250 फूट उंच ‘नवरी’ सुळका  भोसरीतील तरुणाने तीन  तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर सर केला. पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली  या तरुणाने सरत्या वर्षाला निरोप देत या वर्षात महत्वाची कामगिरी पार पडलेल्या कोरोना योद्ध्यांना सलामी दिली. स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीचे  औचित्य साधून ही कामगिरी पार पाडण्यात आली.

रोहित शांताराम जाधव असे ‘नवरी’ सुळका सर केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मूळचा साताऱ्याचा असून, नोकरी निमित्त भोसरीमध्ये स्थायिक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातही जाधव यांनी नोकरी सांभाळून गिर्यारोहणाची आवड जोपासली असून , वजीर, लिंगाणासारखे अवघड सुळके त्यांनी सर केले आहेत .

शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा 250 फूट उंच ‘नवरी’ सुळका सर करण्यासाठी जाधव यांना पुण्यातील होमोपॅथिक कन्सल्टंट डॉ. मनीषा सोनवणे यांची साथ मिळाली.  नाशिकपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर  हा सुळका आहे. याची उंची अडीचशे फूट असून सुळक्याच्या आजूबाजूला अंजनी ब्रह्मगिरी पर्वत आहे. या सुळक्याला जोडूनच आणखी एक सुळका आहे त्यामुळे या दोन सुळक्यांना ‘ सुळके असे संबोधले जाते.

याबाबत रोहित जाधव म्हणाले, हा सुळका सर करण्यासाठी सकाळी 8 वाजता  चढाई करण्यास सुरुवात केली. साधारण तीन तासांनी सुळका सर करण्यात यश आले . ‘चिमणी क्लाइंबिंग द्वारे ही मोहीम पूर्ण करण्यात आली. पॉइंट ब्रेक एडवेंचर या संस्थेचे सदस्य मोहिमेमध्ये टेक्निकल सपोर्ट म्हणून उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.