Pimpri news: ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार,लेखक सुरेश कंक यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – स्वर्गीय दिगंबर कुलकर्णी प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, कवी, लेखक सुरेश कंक यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 14 डिसेंबर 2020 रोजी होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी,  गझलकार, मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत वडील स्वर्गीय दिगंबर कुलकर्णी  प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामध्ये ‘एमपीसी न्यूज’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार  विवेक इनामदार, शहरातील साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक सुरेश कंक यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश मिळवणारा अभिजित गहिनीनाथ पाखरे  तसेच निसर्गमित्र ज्ञानेश्वर शिरसाट आणि वैद्यकीय क्षेत्रात माणुसकी जपणारे दांपत्य अभय दिवाण व सुवर्णा दिवाण यांना पहिला ‘समाजदूत’  पुरस्कार  जाहीर झाला आहे.


स्व.दिगंबर कुलकर्णी प्रतिष्ठान 14 डिसेंबर 2020 रोजी हे पुरस्कार  प्रदान करणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष  कुलकर्णी यांनी दिली आहे.\

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.