Sambhaji Bhide : ‘समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका’

एमपीसी न्यूज : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात येण्याची शक्यता आहे. (Sambhaji Bhide) अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत देखील संभाजी भिडे यांनी मांडले आहे.

Pimpri News : वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई

अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका. जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. (Sambhaji Bhide) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांना अश्रृ अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.