Wakad : श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी डांगे चौक, थेरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

धरणे आंदोलनाच्या वेळी अॅड सुजीत बाकले, ज्ञानदेव लोभे, सतिश कदम, सुनील साळुंके, दीपक खैरनार, संतोष बादाडे, रशीदभाई सय्यद, दीपक जोगदंड, विनोद घोडके, परशुराम रोडे, उध्दव शिवले, अशोक सातपुते, एम एम इनामदार, भैय्यासाहेब गजधने, संतोष शिंदे, बाळासाहेब साने, अंबादास जाधव, अनिल ताडगे, सुभाष जाधव, अनिल सावंत, सागर आवटे, जयश दाभाडे, संजय बनसोडे, विनायक जाधव, भारत मिलपगारे, अजय लोंढे, सुभाष साळुंके, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, निलेश शेंडगे, सुभाष गुंगाराव, संतोष वाव्हळ, प्रमोद शिंदे, बबलू काळे, गौरव धनवे, हमीद शेख, गौतम दिवे, विजय कलशेट्टी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून पोलीस निरीक्षक ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांना निवेदन देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून ही निवेदने देण्यात येत असून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली डांगे चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

“येत्या आठ दिवसांत श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक शांताराम बापू कुंजीर यांनी यावेळी बोलताना दिला. पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे यांनी येत्या चार दिवसात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गुन्हा त्वरित दाखल न केल्यास हे आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात केले जाईल, असे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आठ दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास पोलीस आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. छावाचे धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, रयत विद्यार्थी मंचचे धम्मराज साळवे, बीआरएसपीचे सुनील कांबळे, समाजवादी पक्षाचे नरेंद्र पवार, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव आदींनी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

प्रस्तावना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे यांनी केली. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.