Sambhaji Maharaj Jayanti : चक्क एका दिवसात किशोरवयीन मुलांनी अनवाणी पायाने केले ५ किल्ले सर

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj Jayanti) यांची जयंती पुष्कळ लोक डिजे वाजवून साजरा करतात. याला शह देत पिंपरी चिंचवड शहरातील मोरेवस्ती येथील मुला-मुलींनी कराटे प्रशिक्षण देणाऱ्या U.S.K.A या संस्थेने पाच किल्ले सर केले आहेत. या मार्फत या मुलांनी जनतेला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, की ”आधी इतिहास समजा व त्या सहीत इतिहास जगा.”
या कामगिरीत मुलांना पांडाभाऊ साने युवा मंच, नारी शक्ती महिला मंच यांचे मार्गदर्शनपर सहकार्य लाभले. दिनांक 14 मे ही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते. या निमित्त 9 ते 17 वयोगटातील मुला-मुलींनी कोरिगड, तिकोना, विसापूर, लोहगड, राजगड हे 5 गड सर केले.
Sambhaji Maharaj Jayanti

या पाच गडकिल्ल्यांचा (Sambhaji Maharaj Jayanti) प्रवास हा मुलांनी अनवाणी पायांनी पूर्ण केला आहे. शिवाय विशेष म्हणजे मुलींनी नऊवारी साडी परिधान करून आपला संपूर्ण प्रवास न थकता पार पाडला. या मोहीमेत दिप्ती संतोषी हलकुडे,  पृथ्वीराज सुनिता फडाले‌,  गणेश मनिषा पाटील, नेत्रा शैला थिटे, भक्ती नर्मदा घुले, श्रावणी संतोषी हलकुडे, सानिका सुरेखा यादव, कल्पेश मंगला वाडोकार, गुणवंत मंदा भंगाळे या मुलांनी सहभाग घेतला. तर, प्रफुल्ल शोभा ‌श्रेष्टा यांनी प्रशिक्षण तसेच आरती मल्ला यांनी मार्गदर्शन केले.
या मोहिमेच्या माध्यमातून या मुलांनी महिन्यातून एकदा तरी मुलांसहीत गडकिल्ले सर करावेत व गडकिल्ल्यांवर कचरा पसरवू नये याची दक्षता घ्यावी, असा प्रेरणादायी संदेश दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.