Sambhajinagar : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर दीपोत्सव

एमपीसी न्यूज – शिवराज्य संघटनेच्या वतीने शनिवारी (२६ ऑक्टोबर)  संभाजीनगरच्या बर्ड व्हॅलीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे दीपोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.

 

_MPC_DIR_MPU_II
कार्यक्रमात महिला व मुलांनी शेकडो दिवे लावत बर्ड व्हॅली परिसर उजळवून टाकला. शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव, सोमनाथ बोडके, सुधीर बोडके, सचिन काटकर, दुर्गेश देशमुख, घन:श्याम सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाची सांगता शिववंदनेने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.