New Delhi : 6000 mah बॅटरीचा ‘सॅमसंग गॅलक्सी m 21’ भारतात लाँच

एमपीसी न्यूज : दर्जेदार स्मार्टफोन तयार करणारी आघाडीची मोबाइल कंपनी सॅमसंगने  6000 mah बॅटरीचा ‘सॅमसंग गॅलक्सी m 21’ भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 12,999 इतकी निर्धारित करण्यात आली आहे. येत्या 23 मार्चला दुपारी बारानंतर या फोनची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी m 21 ला 6000 mah बॅटरी असून, त्याला 15 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. 4 जीबी रॅम आणि 54 जीबी स्टोअरेज आहे. 6.4 इंचाचा फुल एचडी इन्फिनिटी यू सुपर एमोलेड डिस्प्ले, 1080 x 2340 पिक्सल रिझोल्युशन, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कार्निन्ग गोरिल्ला ग्लास 3 चे सुरक्षा कवच,  ऑक्टाकोर एक्सिनाॅस 9611  प्रोसेसरसह mali g 72 mp 3 gpuचा समावेश करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर आधारित one ui 2.0वर कार्य करतो.

दर्जेदार फोटोग्राफीसाठी रिअरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील पहिला 48 मेगापिक्सेल , दुसरा 8 मेगापिक्सेलची 123 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे.  तर फ्रंटल सेल्फी आणि व्हिडिओ कॅलिंगसाठी 20  मेगापिक्सेल सेंसरचा कॅमेरा आहे.  शिवाय हॅण्डसेटच्या मागे फिंगर प्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4 g VoTE, वायफाय, ब्लुटूथ, जीपीएस, यूएसबी टाईप -सी आणि 3.5 mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. या स्पार्टफोनचे वजन 188 ग्रॅम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.