Sanaswadi Fire News : सणसवाडी येथील सिंटेक्स कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

0

एमपीसीन्यूज : पुणे – नगर महामार्गावरील औदयोगिक वसाहत असलेल्या सणसवाडी (ता.शिरूर) येथील प्लॅस्टिक टाक्या बनवणाऱ्या सिंटेक्स बीएपील लिमिटेड कंपनीला आज आग लागली. या कंपनीत संपूर्ण प्लास्टिकचा कच्चा माल असल्याने धुराचे प्रचंड लोट सणसवाडी, शिक्रापूर परिसरात दिसू लागले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

दरम्यान, आगीत जीवितहानी झाली नाही. या कंपनीमध्ये 700 च्या आसपास कामगार करत आहेत .

मागील महिन्यात सरकारने जीआर काढून सेफ्टी अधिकाऱ्याने कधीच सेफ्टी तपासणीसाठी सरकारच्या परवानगीशिवाय न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेफ्टी तपासणीवर निर्बंध आले आहेत व त्यामुळेच सेफ्टी नसल्याने कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पूर्वी प्रमाणेच सेफ्टी संदर्भातील नियम असायला हवेत.

_MPC_DIR_MPU_II

परंतु, सरकारचा निर्णय कंपनी मालक धार्जिणा असून सरकार कंपनी मालकाच्या दबावाखाली आहे. सरकार तपासणीसाठी परवानगी मिळण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लावते. तोपर्यंत कंपनी व्यवस्थापन तात्पुरती उपाययोजना करून ठेवते व मूळ सुरक्षा त्यामुळे धोक्यात आलू असल्याचे राष्ट्रीय कामगार आघाडीचे कामगार नेते यशवंत भोसले यांनी सागितले.

जवळपास 500च्या कामगार संख्या आहे. या मध्ये कामगारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती व्यवस्था कंपनी व सरकारने करावी. कामगारांचे संसार उघड्यावर येणार नाही याची काळजी घायवी, असेही यशवंत भोसले यांनी सांगितले.

प्रत्येक कंपनीने व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवली पाहिजे. अग्निशमन दलाला सेवा देण्याची वेळ येऊ नये, अशी सुरक्षा व्यवस्था ठवेण्याची गरज आहे. तरीही अग्निशमन दल मार्गदर्शन करण्यास कायम सज्ज असते. देवेंद्र पोटफोडे – मुख्य अग्निशमन अधिकारी पीएमआरडीए.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment