Dighi Crime News : इंद्रायणी नदीत वाळू चोरी ,1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त 

चौदा जण अटकेत,

एमपीसी न्यूज – वाळू चोरी प्रकरणी चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या जवळून वाळू साठ्यासह 1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत. बुर्डेवस्ती, च-र्होली, इंद्रायणी नदी जवळ शुक्रवारी (दि.19) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

याप्रकरणी 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नाईक शिवाजी शिंगाडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक 14 आरोपींनी इंद्रायणी नदीतून विना परवाना वाळू चोरी केली. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून जेसीबी, पोकलेन, ट्रॅकर यासह 1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.