Pimpri : भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीकडून संदीप कांबळे यांची उमेदवारी निश्चित

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाली असून लवकरच घोषणा

एमपीसी न्यूज – भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीकडून संदीप कांबळे (गुरुजी) यांना पिंपरी विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवत आहे, अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाली असून लवकरच तिची घोषणा करण्यात येणार आहे. अनेक दिग्गज ऊमेदवारांचा समावेश पहिल्या यादीत करुन भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी मोठा धमाका करु शकते, असा कयास बांधला जात आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल सिंग चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष सागर राऊत हे उमेदवार निश्चितीचे काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.